१०२ वकील पानसरे परिवाराची बाजू मांडणार
By admin | Published: October 7, 2015 01:07 AM2015-10-07T01:07:48+5:302015-10-07T01:07:48+5:30
कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाडचे वकीलपत्र घेण्यास कोल्हापूर बार असोसिएशनने नकार दिला असतानादेखील
पंढरपूर : कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाडचे वकीलपत्र घेण्यास कोल्हापूर बार असोसिएशनने नकार दिला असतानादेखील पंढरपुरातील सनातन संस्था आणि समीर गायकवाडशी संबधित काही वकिलांनी गायकवाडच्या बाजूने वकीलपत्र दाखल केलेले आहे. त्यामुळे पंढरपुरातील १०२ वकील कॉ. पानसरे यांच्या परिवाराची बाजू मांडणार असल्याचे ‘आम्ही पुरोगामी लोक’ या संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
अॅड़ पानसरे यांच्या खूनप्रकरणी उमा पानसरे यांनी न्यायालयात बाजू मांडण्यासाठी लोकशाहीवादी, समतावादी वकिलांनी उभे राहण्यासंदर्भात आवाहन केलेले होते. त्यास महाराष्ट्रातील वकिलांनी प्रतिसाद दिला आहे. पंढरीत ‘आम्ही पुरोगामी लोक’ या संस्थेच्या वतीने पंढरपूर बार आसोसिएशनला याबाबत आवाहन केले होते़ त्यास प्रतिसाद देत, पंढरपुरातील १०२ वकिलांनी हे वकीलपत्र स्वीकारले आहे.
कॉ. पानसरे यांचा खून चांगले विचार संपवण्यासाठी झाला आहे. हे कृत्य योग्य नाही. यामुळे पंढरपुरातील वकीलांनी कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयाच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला आहे.
- अॅड. आर. टी. कोष्टी,
विधीतज्ज्ञ,
पंढरपूर