१०२ हेल्पलाइन गर्भवती महिलांसाठी वरदान

By admin | Published: December 30, 2015 01:26 AM2015-12-30T01:26:16+5:302015-12-30T01:26:16+5:30

राज्यातील ग्रामीण परिसरात, दुर्गम भागात, जेथे दळणवळणासाठी साधने सहज उपलब्ध नाहीत अशा ठिकाणच्या गर्भवती महिलांना प्रसूतीकळा सुरू झाल्यास रुग्णालयापर्यंत पोहोचणे अधिक

102 Helpline for women pregnant | १०२ हेल्पलाइन गर्भवती महिलांसाठी वरदान

१०२ हेल्पलाइन गर्भवती महिलांसाठी वरदान

Next

मुंबई : राज्यातील ग्रामीण परिसरात, दुर्गम भागात, जेथे दळणवळणासाठी साधने सहज उपलब्ध नाहीत अशा ठिकाणच्या गर्भवती महिलांना प्रसूतीकळा सुरू झाल्यास रुग्णालयापर्यंत पोहोचणे अधिक जिकिरीचे होते. या महिलांसाठी १०२ हा टोल फ्री क्रमांक सध्या वरदान ठरत आहे.
गेल्या वर्षात या क्रमांकामुळे ४१ हजार ३०५ गर्भवती महिलांना रुग्णालयांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. १०२ हा क्रमांक लावल्यास तत्काळ जवळपासच्या परिसरातील रुग्णवाहिका
त्या पत्त्यावर पाठवण्यात येते. ही रुग्णवाहिका सुसज्ज असते. कोणतेही शुल्क न घेता गर्भवती महिलांना रुग्णालयापर्यंत पोहोचवणे, डिस्चार्ज मिळाल्यास बाळ आणि आईला घरी पोहोचवणे ही सुविधा देण्यात येते; तर २ वर्षापर्यंतच्या बाळांना रुग्णालयात नेण्याची वेळ आल्यास मोफत सेवा दिली जात असल्याचे या सेवेशी संबंधित असलेले विवेक शेळके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

मोफत रुग्णवाहिका सेवा
गर्भवती महिला आणि नवजात बालकांचे आरोग्य चांगले राहावे आणि माता, बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी १०२ क्रमांकावर मोफत रुग्णावाहिका सेवा उपलब्ध आहे.

दोन हजारांवर रुग्णवाहिका ३४ जिल्ह्यांमध्ये १०२ या टोल फ्री क्रमांकासाठी २ हजार ४८८ रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिका तालुका, जिल्हा पातळीवरील आरोग्य केंद्रे, रुग्णालये, दवाखाने येथे उपलब्ध असतात.

जानेवारी २०१५ ते
२८ डिसेंबर २०१५ कालावधीतील कॉल्स
एकूण कॉल : २६,५४,८५२
प्रतिसाद दिलेले : १५,१४,१००
योग्य कॉल्स : ४१,३०५
अनावश्यक कॉल्स : १४,६२,५७६
वेटिंग, मिस्ड कॉल्स : ११,४०,७५२

Web Title: 102 Helpline for women pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.