राज्यात १०२ टक्के पावसाचा अंदाज
By admin | Published: June 2, 2016 12:57 AM2016-06-02T00:57:00+5:302016-06-02T00:57:00+5:30
जागतिक स्थरावर हवामानात मोठ्याप्रमाणात बदलत होत असून, भारतात त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. या वर्षी राज्यात १०२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
कोल्हापूर : दुष्काळाच्या झळा कोल्हापुरातील ऊसपट्ट्यालाही बसत असून, शेतातील ऊस वाळला आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाळलेला ऊस घेऊनच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यानंतर मोर्चाने येऊन आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या टेबलावरच हा वाळलेला ऊस ठेवत आर्थिक अरिष्टात सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज शासनाने माफ करावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
दुपारी एकच्या सुमारास शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील-वाकरेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी वाळलेला ऊस घेऊनच निदर्शने केली. यानंतर घोषणाबाजी करत सर्व आंदोलक मोर्चाद्वारे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाकडे आले. यावेळी आंदोलकांना वाळलेला ऊस आत घेऊन जाण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली. परंतु, शेतातील वाळलेला ऊस प्रशासनाला दिसावा यासाठी ऊस आम्ही घेऊन जाणारच, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनीच त्यांना उसासह आत येण्यास सांगितले. आत आल्यानंतर आंदोलकांनी थेट निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर वाळलेला ऊस ठेवून चर्चा करायला सुरुवात केली. यानंतर रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.
कोल्हापूर जिल्हा हा ऊसपट्टा असल्याने दुष्काळाच्या झळा बसल्या असून, शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. संपूर्ण शेती तोट्यात गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी घेतलेली शेती कर्जे परतफेड करू शकत नाही. म्हणून शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जे माफ करावीत. त्याचबरोबर दुष्काळामुळे जो ऊस वाळलेला आहे, त्या वाळलेल्या उसाचे पंचनामे करून एकरी ५०,००० रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी. तरच पुढील वर्षी शेती करणे शक्य होणार आहे. आंदोलनात अॅड. माणिक शिंदे, दिलीप माणगावे, अॅड. अजित पाटील, आदी सहभागी झाले होते.
वाळलेल्या उसासह अन्य पिकांचे पंचनामे करा : नरके
जिल्ह्यातील उसासह अन्य पिके वाळली असून त्यांचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला कराव्यात; तसेच जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठवावा, अशी मागणी बुधवारी आमदार चंद्रदीप नरके यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आज, गुरुवारी याबाबत योग्य ती माहिती देऊ, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. दरम्यान याविषयी आमदार नरके यांनी महसूल राज्यमंत्री संजय ठाकूर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यास सांगितले.