१०५ कंत्राटी चालकांचे मानधन थकले

By Admin | Published: June 7, 2017 04:11 AM2017-06-07T04:11:01+5:302017-06-07T04:11:01+5:30

केडीएमसीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या १०५ वाहनचालकांना तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही

105 Contract workers' monetary tiredness | १०५ कंत्राटी चालकांचे मानधन थकले

१०५ कंत्राटी चालकांचे मानधन थकले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या १०५ वाहनचालकांना तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यांच्या मानधनाचा विषय मंगळवारच्या महासभेत मंजूर केला जाणार होता. मात्र, महासभाच तहकूब झाल्याने त्यांचे मानधन लांबणीवर पडले आहे. पावसाळा तोंडावर आल्याने घराची डागडुजी, कुटुंबाचा मासिक खर्च आणि १५ जूनपासून मुलांच्या शाळा सुरू होणार असल्याने वह्या, पुस्तके, गणवेशाचा खर्च कसा करा करायचा, असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत.
कल्याण-डोंबिवलीत घनकचऱ्याचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. घनकचरा प्रकल्प राबवण्यात होणाऱ्या दिरंगाईप्रकरणी उच्च न्यायालय तसेच हरित लवादाकडे याचिका न्यायप्रविष्ट आहे. कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी महापालिकेने राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून गाड्या खरेदी केल्या होत्या. या गाड्या अन्थोनी वेस्ट हॅण्डलिंग कंपनीला चालवण्यास दिल्या होत्या. मात्र, या कंपनीचे काम असमाधानकारक असल्याने त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले. परंतु, महापालिकेने कामावर ठेवावे, यासाठी त्यांंनी औद्योगिक न्यायालयात लढा दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार २०१२ पासून हे चालक कार्यरत आहेत. मात्र, त्यांना तीन महिन्यापांसून मानधन दिले गेलेले नाही. दरमहा त्यांना १० हजार मानधन दिले जाते. त्यात वाढ केल्याने आता १६ हजार दिले जाणार आहेत. तीन महिन्यांचे ४२ हजार रुपये प्रत्येक वाहनचालकाचे थकले आहेत.
महापालिकेने हे थकीत मानधन द्यावे, कंत्राटाला मुदतवाढ द्यावी, असा विषय मंगळवारच्या महासभेच्या पटलावर होता. परंतु, आयुक्तांच्या बदलीसत्राच्या कुरघोडीमुळे महासभा तहकूब झाल्याने त्यांचा विषय बारगळला. महापौरांच्या गैरहजेरीमुळे सभा झाली नसल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक राजन सामंत यांनी केला आहे.
>...तर आरोग्य प्रश्न गंभीर
कंत्राटी वाहन चालकांच्या सहा महिने नियुक्तीचा कालावधी २८ फेब्रुवारीला संपला. एक दिवसाचा खंड देऊन त्यांना पुन्हा १ मार्च २०१७ पासून सहा महिने मुदतवाढ देणे आवश्यक आहे. मात्र, वारंवार सभा तहकूब होत असल्याने त्याचा फटका या कामगारांना बसला आहे.
या कामगारांचा संबंध दररोज घाणीशी येतो. एक दिवस कचरा वाहून न नेल्यास कचराकुंड्या तुडुंब भरतात. तसेच कचरा रस्त्याच्या लगत पडून राहतो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
पावसाळा तोंडावर आहे. पावसाळ््यात कचरा न उचलल्यास अनारोग्याची स्थिती निर्माण होऊ शकते. तीन महिने मानधन मिळाले नसले तरी कामगारांनी काम थांबवलेले नाही. पगार मिळण्याच्या आशेवर ते काम करत आहेत. या विषयाला तातडीने मान्यता देऊन त्यांचा मानधनाचा मुद्दा निकाली काढावा, अशी अपेक्षा नगरसेवक सामंत यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: 105 Contract workers' monetary tiredness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.