मराठा क्रांती मोर्चामध्ये १०६ वर्षांच्या आजीबाईंचा सहभाग
By admin | Published: September 28, 2016 12:19 PM2016-09-28T12:19:41+5:302016-09-28T12:28:33+5:30
राज्याच्या विविध भागांमध्ये रोज मराठा समाजाचे लाखोंच्या गर्दीचे मोर्चे निघत असून, आज धुळयामध्ये मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. २८ - राज्याच्या विविध भागांमध्ये रोज मराठा समाजाचे लाखोंच्या गर्दीचे मोर्चे निघत असून, आज धुळयामध्ये मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. धुळयातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापासून या मोर्चाची सुरुवात होणार आहे. मोर्च्यासाठी गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे.
काही ठिकाणी मोर्च्यात सहभागी होणा-या नागरीकांसाठी नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोपर्डी बलात्कार घटनेचा निषेध, मराठा आरक्षण तसेच विविध मागण्यांसाठी दररोज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये लाखोंच्या गर्दीचे मोर्चे निघत आहेत. शहरातील वाडीभोकररोडवरील झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयासमोरून तरुणांनी सकाळी मोटर सायकल रँली काढत मराठा क्रांती मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
मराठा समाजाचे आतापर्यंतचे सर्व मोर्चे शिस्तबद्ध होते. या मोर्च्यातही तीच शिस्त दिसत आहे. नागरीकांच्या मदतीसाठी स्वयंसेवक तैनात आहेत. या मोर्च्यात १०६ वर्षांच्या आजीबाई सुशीलाबाई पाटीलही सहभागी झाल्या आहेत.