संयुक्त महाराष्ट्र लढ्यात १०७ व्या हुतात्म्याची नोंद!

By admin | Published: January 22, 2016 03:39 AM2016-01-22T03:39:27+5:302016-01-22T03:39:27+5:30

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील १०७वे हुतात्मा म्हणून शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची नोंद झाली आहे. तोरस्कर कुटुंबियांनी सातत्याने शासनाकडे

107th martyrdom martyrdom in the United Maharashtra fight! | संयुक्त महाराष्ट्र लढ्यात १०७ व्या हुतात्म्याची नोंद!

संयुक्त महाराष्ट्र लढ्यात १०७ व्या हुतात्म्याची नोंद!

Next

कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील १०७वे हुतात्मा म्हणून शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची नोंद झाली आहे. तोरस्कर कुटुंबियांनी सातत्याने शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला तब्बल ५९ वर्षांनंतर न्याय मिळाला आहे.
राज्य शासनाने २०११ साली महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या चळवळीतील हुतात्म्यांची यादी जाहीर केली. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील शंकरराव तोरस्कर यांचे नाव नव्हते. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी राज्य शासनाच्या विविध खात्यांकडे अर्ज-विनंत्या व पुरावे सादर केले. त्यांच्या कष्टाला यश आले. १३ जानेवारी २०१६ रोजी राज्य शासनाने अखेर शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची हुतात्मा म्हणून नोंद केल्याची माहिती नातू संजय तोरस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शंकरराव तोरस्कर हे पहिले बलिदान देणारे पश्चिम महाराष्ट्रातील ते एकमेव शिलेदार होते. १८ जानेवारी १९५६ रोजी बिंदू चौक येथे झालेल्या सभेत शंकरराव पोलिसांच्या गोळीने, बंदुकीच्या संगिनीने जखमी झाले. यातच त्यांचा सात दिवसांत मृत्यू झाला.
तशी ही घटना ५० वर्षांहून अधिक काळाची होती. तिचे पुरावे मिळविणे तसे कुटुंबीयांना अवघड काम होते. तरीही त्यांच्यासमवेत त्यावेळी असणारे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी आमदार बाबूराव धारवाडे, पैलवान नारायण जाधव यांनी स्वत: येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जबाब नोंदविले.
अखंड पाठपुराव्यानंतर अखेर शासनाने १०७वे हुतात्मा म्हणून असाधारण राजपत्रात त्यांची नोंद घेतली. याबाबतचे पत्र सामान्य प्रशासन विभागाकडून १३ जानेवारीला तोरस्कर कुटुंबियांना मिळाले. (प्रतिनिधी)

Web Title: 107th martyrdom martyrdom in the United Maharashtra fight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.