१०८ रुग्णवाहिका बनली माथेरानची जीवन वाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2017 02:47 AM2017-03-07T02:47:29+5:302017-03-07T02:47:29+5:30
माथेरान पर्यटन स्थळ असून इंग्रजांच्या काळापासून येथे मोटार वाहनांना पूर्णपणे बंदी असून फक्त रुग्णवाहिकेला परवानगी आहे.
माथेरान : माथेरान पर्यटन स्थळ असून इंग्रजांच्या काळापासून येथे मोटार वाहनांना पूर्णपणे बंदी असून फक्त रुग्णवाहिकेला परवानगी आहे. त्यामुळे नगरपालिकेची एक आणि महाराष्ट्र शासनाची १०८ अशा दोन रु ग्णवाहिका माथेरानमध्ये धावत आहेत, त्यापैकी १०८ ही रु ग्णवाहिका माथेरानची जीवन वाहिनी ठरत आहे.
डॉ.उदय तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षांपासून ही रुग्णवाहिका माथेरान व परिसरामध्ये कार्यरत आहे. महिन्याला ३० ते ३५ व वर्षाला ४२५ पेक्षा जास्त रु ग्णांना ही रुग्णवाहिका उपयुक्त ठरते. माथेरानबाहेरील आदिवासी वाड्यांना सुद्धा या रु ग्णवाहिकेचा फायदा मिळतो. या रु ग्णवाहिकेत कार्डियाक सिस्टम असल्याने रु ग्णाला मोठ्या हॉस्पिटलपर्यंत जाण्यास खूप मोठी मदत मिळते तसेच २४ तास चालक व डॉक्टर या रु ग्णवाहिकेत उपलब्ध आहेत,माथेरान हा दुर्गम भाग असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकास काही दुखापत झाल्यास ही रु ग्णवाहिका तत्काळ उपलब्ध असल्याने या रु ग्णवाहिकेस माथेरानमध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे. या कारणास्तव ही रु ग्णवाहिका माथेरानसाठी जीवन वाहिनी ठरत आहे.
१०८ ही महाराष्ट्र शासनाची रु ग्ण वाहिका आल्यापासून तीन वर्षांच्या कालखंडात १२०० पेक्षा जास्त रु ग्णांना याचा फायदा झाला आहे. गर्भवती महिला, हृदयविकार रु ग्ण, अर्धांग वायू रु ग्ण, श्वसनाचे विकार असलेले रु ग्ण, घोड्यावरून अपघाती पडलेले पर्यटक तसेच माथेरान परिसरातील आदिवासी वाड्या या रु ग्णांना आतापर्यंत या रुग्णवाहिकेचा खूप फायदा झाला आहे. (वार्ताहर)
>माथेरान नगरपालिका क वर्गाची असल्याने येथील रु ग्णालयात सर्व सोयी-सुविधा पुरविणे शक्य होत नाही.अशा वेळेस रु ग्णाला त्याच्या इच्छित रु ग्णालयामध्ये पोहोचण्यास या रु ग्णवाहिकेचा उपयोग होत आहे.माथेरानमध्ये घोड्यावरून पडून अपघात झालेल्या पर्यटकांना सुद्धा या रु ग्णवाहिकेचा खूप मोठा आधार आहे. त्यामुळे नक्कीच १०८ ही रु ग्णवाहिका माथेरानकरांसाठी जीवनदायी ठरत आहे.
- प्रेरणा प्रसाद सावंत,
नगराध्यक्षा
>गेली तीन वर्षे या रु ग्णवाहिकेवर डॉक्टर म्हणून मी कार्यरत आहे. या रु ग्णवाहिका आल्यापासून हृदयविकाराने दगावणाऱ्यांची संख्या खूप कमी झाली आहे. माथेरानच्या नगरपालिका रुग्णालयामध्ये काहीच सोयी-सुविधा नसल्याने येथील रु ग्णांना येथून तत्काळ हलविण्यास या रुग्णवाहिकेचा उपयोग होतो. आॅक्सिजनयुक्त सेवा असल्याने येथील दुर्गम भागातून रु ग्णाला घेऊन इतर रुग्णालयात जाणे शक्य होते.
- डॉ. सचिन वाणी,
माथेरान