१०८२ विसरभोळे प्रवासी
By Admin | Published: February 6, 2016 03:35 AM2016-02-06T03:35:42+5:302016-02-06T09:29:34+5:30
रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) हेल्पलाईनवर जानेवारी महिन्यात मदत आणि तक्रारींचा खच पडल्याचे समोर आले आहे. ९८३३३३११११ हेल्पलाईनवर तब्बल १,७६२ कॉल आले.
मुंबई : रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) हेल्पलाईनवर जानेवारी महिन्यात मदत आणि तक्रारींचा खच पडल्याचे समोर आले आहे. ९८३३३३११११ हेल्पलाईनवर तब्बल १,७६२ कॉल आले. यापैकी सर्वाधिक १०८२ कॉल रेल्वेत बॅग विसरलेल्या व्यक्तींचे होते.
त्यानंतर प्रवाशांचे अन्य सामान हरविल्याचे २३७ कॉल आले होते. जवळपास १0 लाख ६२ हजार २५ रुपये किंमतीच्या वस्तू आणि सामान सापडले व ते प्रवाशांना परत करण्यात आले. यात ६ लाख ४ हजार ९00 रुपये किंमतीचे २0 लॅपटॉप, १ लाख १00 रुपये किंमतीचे १६ मोबाईल, तीन लाख रुपये किंमतीचे १२0 ग्रॅम सोने आणि ५७ हजार २५ रुपये रोख रक्कमचा समावेश होता, अशी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)कॉलची कारणे व संख्या
अपघातग्रस्तांना मदत - ९२
सीआरपीसी/आयपीसी - ६
संशयित बॅगांबाबत कॉल - १0८
संशयित इसमांबाबत कॉल - १३
बॅगा विसरल्याचे कॉल - १,0८२
अन्य सामान हरविल्याचे कॉल -२३७
मारामारी/भांडणाबाबतचे कॉल - ५६
हरविलेल्या व्यक्तीसाठी कॉल - ३९
फेरिवाल्यांबाबत कॉल - ६
विकलांगबाबत कॉल - २३
महिला डब्याबाबत कॉल - ८३
रेल्वे प्रशासनाविषयी कॉल - १३
बॉम्ब अफवांचे कॉल - ४