आदर्श शिक्षक पुरस्काराने राज्यभरातील 109 शिक्षक सन्मानित

By Admin | Published: October 8, 2016 07:30 PM2016-10-08T19:30:42+5:302016-10-08T19:30:42+5:30

2015-16 या वर्षीच्या राज्य आदर्श शिक्षक व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारांनी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 109 शिक्षकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला

109 teachers across the state honored with the Adarsh ​​Teacher Award | आदर्श शिक्षक पुरस्काराने राज्यभरातील 109 शिक्षक सन्मानित

आदर्श शिक्षक पुरस्काराने राज्यभरातील 109 शिक्षक सन्मानित

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 :  केंद्र शासनाच्या ‘भारतनेट’ च्या धर्तीवर राज्य सरकार ‘महाराष्ट्र नेट’चा प्रयोग सुरु करणार असून त्या माध्यमातून गावा-गावात आरोग्य आणि शिक्षणाच्या सेवा पोहोचविण्यात येणार आहेत, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री श्री. देवेद्र फडणवीस यांनी आज केली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सन 2015-16 या वर्षीच्या राज्य आदर्श शिक्षक व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारांनी आज उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  109 शिक्षकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.  कार्यक्रमास शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, राहुल नार्वेकर, प्रधान सचिव नंद कुमार, शिक्षण आयुक्त धीरज कुमार, संचालक नामदेव जरग, गोविंद नांदेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गेली अनेक वर्षे शिक्षणामध्ये सतत चौदा किंवा पंधराव्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र वर्षभरातच तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. आगामी काळात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्कृष्ट शिक्षक यांच्यामुळे महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रात देशात सर्वोच्च स्थान प्राप्त करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
अर्थसंकल्पामध्ये 50 हजार कोटी रुपये आपण शिक्षणावर खर्च करतो, परंतु हा खर्च नाही तर ही आपली भविष्याची गुंतवणूक आहे. आजचे शिक्षक पुढील पिढी घडवताहेत, उत्कृष्ट मानव संसाधन निर्माण करत आहेत. उत्कृष्ट मानव संसाधन असलेला देश, राज्य नेहमी प्रगतीकडे जातो असे सांगून आजच्या शिक्षकांचे भावी पिढी घडविण्यात मोठे योगदान असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
‘भारत नेट’च्या धर्तीवर ‘महाराष्ट्र नेट’चा प्रयोग राबवणार
आज डिजिटल क्रांतीमुळे शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचत आहे. ज्ञानाची दारे डिजिटल तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले झाले. यावर्षी 25 हजार शाळा डिजिटल ऑफलाईन केल्या आहेत. केंद्र शासन ‘भारत नेट’ प्रयोग राबवित आहेत, त्याच धर्तीवर ‘महाराष्ट नेट’ प्रयोग राबविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.  या प्रयोगांतर्गत आरोग्य आणि शिक्षण या महत्त्वपूर्ण सेवा गावागावात पोहोचविल्यात येणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायती डिजिटल करण्यात आल्या हे याचे महत्त्वाचे उदाहरण आहे. या डिजिटल क्रांतीमुळे शहर आणि ग्रामीण असा भेदभाव दूर झाला असून डिसेंबर 2018 पर्यंत ग्रामपंचायतीपर्यंत डिजिटल कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय सगळ्या शाळा ऑनलाईन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
 
राज्यभरातील 109  आदर्श शिक्षकांचा सन्मान
या कार्यक्रमात राज्यभरातील 109 शिक्षकांना आदर्श शिक्षक व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.  यात 38 प्राथमिक शिक्षक, 39 माध्यमिक शिक्षक, 19 आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक, 2 कला/क्रीडा क्षेत्रातील शिक्षक, 2 स्काऊट गाईड शिक्षक,1 अपंग शिक्षक, 8 सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका अशा एकूण 109 ‍शिक्षकांचा समावेश आहे.  
प्राथमिक शिक्षक पुरस्कार - एकनाथ नरहरी आव्हाड, हर्षला प्रविण पाटील, भावना जयंत शेठ, संतोष सुभाष सोनवणे,  सुलोचना विलास पाटील, वेच्या रुध्या गावीत, दत्तू रामा सकट, शिवाजी विष्णू  जरग, हेमा शिंदे, संदीप बाळासाहेब वाघचौरे, विलास जगन्नाथ गवळे, हेमलतर पंढरीनाथ पाटील,भामिनी श्रावण महाले, सुनिल पितांबर पाटील, हिंदूराव राजाराम मातले, शामराव धोंडीराम माने, अर्जुन  हरिभाऊ कोळी,माधुरी रमाकांत देवरुखकर, संजय रमाकांत बगळे, मीनाक्षी रामकृष्ण गोसावी, जगदीश श्रीकृष्ण कुडे, राजेंद्र शाहुराव लाड, शिवाजी धेनू राठोड, गजानन नामदेव पायघन, प्रतिभा काशिनाथ मुळे, राजेश गोविंदराव कुलकर्णी, समाधान वसंत शिकेतोड, मंगला केशवराव घंगारे, पुरुषोत्तम पुंडलीक झोडे, प्राजक्ता प्रल्हाद रणदिवे, हरीश चंद्रभानजी ससनकर, राजेंद्र नीलकंठ घुगरे, अर्चना यादवराव देशकर, ज्योती विजय उभाड, श्रीकृष्ण बालीकराम डाबलकर, दीपक राजारामजी राऊत, भिका प्रल्हाद जावरे, खुर्शिद खाँ बिस्मिल्ला खाँ पठाण
माध्यमिक शिक्षक पुरस्कार -- अंकुश महादेव महाडीक, डॉ.राजू जयसिंग पाटोळे, अनिल दोधू बोरनारे, संजय पुंडलिक पाटील, काळूराम नारायण धनगर, गणेश जानराव प्रधान, बबन बलभिम सांळुके, डॉ. सतीश भालचंद्र गवळी, व्यंकटराव मानजीराव भताने, उदयकुमार बाबरगोंडा पाटील, अण्णासाहेब सावळेराम चोथे, बाळासाहेब कारभारी महाले, नरेंद्र मधुकर जोशी, नुतनवर्षा राजेश वळवी, रामकृष्ण काशिरामपाटील, संजय शामराव मगदूम, दादासो नरसगोंडा पाटील, अशोक मारुती सोमदे, विठ्ठल सखाराम माने, शरदकुमार उत्तम शेटे, चंद्रकांत साहेबराव गायकवाड, अनिल बालमुकुंद पांडे, मनोजकुमार भगवान सातपुते, श्रीपाद माधवराव पुजारी, माधवी सदाशिवराव मुंडेकर, डॉ. अजय दिगंबरराव महाजन, देविदास कचरु तारु, बालाजी मदन इंगळे, वंदना दिलीप बडनाईक, मनोहर मंगलजी मेश्राम, सुनील ओंकारप्रसाद श्रीवास्तव,स्मिता भगवंतराव कोकाटे, मनिष भरतकुमार शेटे, रंजना प्रदीप दाते, निळकंठ नथ्थुजी बारोळे, गोपाल रामराव मानकर, उदय कमलाकर नांदगांवकर, नंदकिशोर तुकाराम बोकाडे, पंचशीला वाल्मिक इंगोले.
आदिवासी विभागात काम करणारे पुरस्कार विजेते प्राथमिक शिक्षक- केशव दामू शेलवले, तानाजी शंकर गवारी, प्रतिभा जतिन कदम, कोंडीबा सोमा लांडे, बाळू धोंडिबा बिन्नर, देवेंद्र तानाजी पाटील, चंद्रकांत कृष्णाजी महाजन, सुनील अभिमन पाटील, संजय शंकरराव देवरे, नरेद्र बापूजी खैरनार, गुरुदत्त गोविंद निंबाळे, गणेश नुरसिंग जाधव, गोविंदा बारसूजी ढाले, मधुरकुमार शोभेलाल नागपूरे, धनराज चिंतामण गेडाम, प्रभु वैदय सिताराम, भाऊराव धर्माजी कुनधाडकर, वैशाली विश्वासराव सरोदे,प्रदीप गणपत जाधव
विशेष शिक्षक (क्रीडा व कला) पुरस्कार - प्रमोद भालचंद्र पाटील, संजय किसन पाटोळे
स्काऊट व गाईड शिक्षक पुरस्कार - सतीश वसंत कोल्हे, राधा मोहनराव मुरकुटे,
अपंग शिक्षक पुरस्कार --रेहमान अताऊर अतीकुर
थोर समाज सेवक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार- स्मिता सुधीर माळवदे, संध्या सतीशचंद्र कुलकर्णी, वंदना भगवानराव ठेंग,  सुमित्रा शिवाजीराव येसणे, सरला शामराव कामे,  चंद्रकला शिवाजी देशमुख, शुभ्रा सोमनाथ रॉय, वैशाली श्रीधर धाकुलकर.
 

Web Title: 109 teachers across the state honored with the Adarsh ​​Teacher Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.