सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; दिवाळीच्या गर्दी हंगामात एसटीची १०℅ भाडेवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 08:52 PM2023-11-03T20:52:17+5:302023-11-03T20:52:28+5:30

ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू राहणार आहे.

10℅ ST fare hike during Diwali rush season | सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; दिवाळीच्या गर्दी हंगामात एसटीची १०℅ भाडेवाढ

सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; दिवाळीच्या गर्दी हंगामात एसटीची १०℅ भाडेवाढ

मुंबई: दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या काळात सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. महसूल वाढवण्याच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार एसटी महामंडळाने या दिवाळीच्या हंगामात आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

ही भाडेवाढ ७ नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होईल. तसेच,  ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण केले आहे, त्यांच्या तिकीटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे.

Web Title: 10℅ ST fare hike during Diwali rush season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.