११ कोटी ८८ लाख वृक्षाची २४ दिवसांत झाली लागवड- सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 02:00 AM2018-07-26T02:00:09+5:302018-07-26T02:02:04+5:30

सर्वात जास्त म्हणजे ७१ लाख ९२ हजार ८९३ इतकी झाडे नांदेड जिल्ह्यात लागली आहेत.

11 crore 88 lakhs of trees were cultivated in 24 days - Sudhir Mungantiwar | ११ कोटी ८८ लाख वृक्षाची २४ दिवसांत झाली लागवड- सुधीर मुनगंटीवार

११ कोटी ८८ लाख वृक्षाची २४ दिवसांत झाली लागवड- सुधीर मुनगंटीवार

Next

मुंबई : हरित महाराष्ट्राचा ध्यास घेऊन सुरू झालेली वृक्ष लागवड मोहीमेत राज्यभरात २४ दिवसात ११ कोटी ८८ लाख झाडं लागल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सर्वात जास्त म्हणजे ७१ लाख ९२ हजार ८९३ इतकी झाडे नांदेड जिल्ह्यात लागली आहेत. त्यापाठोपाठ नाशिक जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे ६७ लाख १७ हजार १६३ रोपे लागली तर तिसºया नंबरवर आलेल्या यवतमाळ जिल्हाने ६२ लाख ७१ हजार ७३८ वृक्ष लागवड केली आहे.
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात ५९ लाख ५२ हजार ५५८, गडचिरोली जिल्ह्यात ५१ लाख ९० हजार ७१७ वृक्ष लागवड झाली आहे. उस्मानाबाद, अहमदनगर, नंदूरबार, औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये ४० लाखांहून अधिक वृक्ष लागवड झाल्याचे मुनगंटीवार म्हणाले. या मोहीमेची सांगता ३१ जुलै रोजी होणार असून वनविभागाने १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे.
मुनगंटीवार म्हणाले, आतापर्यंत झालेल्या वृक्ष लागवडीमध्ये २८ लाख ५८ हजार २७६ वृक्षस्नेहींनी सहभाग नोंदवला तर १ लाख ४५ हजार ६८३ स्थळांवर ही वृक्ष लागवड झाली आहे. वृक्षलागवडीमध्ये वन विभागाने ६ कोटी ८७ लाख ३८ हजार ८८३, वनेत्तर क्षेत्रात ४ कोटी १४ लाख ४७ हजार १९३, माय प्लांटद्वारे २ लाख ३९ हजार ६१०, रोपे आपल्या दारी कार्यक्रमातून २ लाख ४९ हजार ३७६, हॅलो फॉरेस्ट १९२६ द्वारे ९७७० वृक्ष लागवडीची आॅनलाईन पद्धतीने नोंद झाली आहे तर आॅफलाईन पद्धतीने ८१ लाख ४४ हजार २४६ रोपे लागल्याची माहिती वन विभागाकडे देण्यात आली आहे.
राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीपैकी १२ कोटीच्या आसपास वृक्ष लागवड झाली असून हा संकल्प पूर्णत्वाच्या दिशेला वेगाने जात आहे. ३१ जुलै २०१८ पर्यंत राज्यात संकल्पापेक्षा अधिक वृक्षांची लागवड केली जाईल, असा विश्वास वनमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Web Title: 11 crore 88 lakhs of trees were cultivated in 24 days - Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.