पाण्यासाठी ११ कोटी ५६ लाख मंजूर

By admin | Published: May 19, 2016 03:22 AM2016-05-19T03:22:40+5:302016-05-19T03:22:40+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराच्या विकासासाठी बांधील आहे. येथे सोयी-सुविधा वाढल्या तर पर्यटकांची संख्या वाढेल.

11 crores 56 lacs approved for water | पाण्यासाठी ११ कोटी ५६ लाख मंजूर

पाण्यासाठी ११ कोटी ५६ लाख मंजूर

Next


मुरुड-जंजिरा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराच्या विकासासाठी बांधील आहे. येथे सोयी-सुविधा वाढल्या तर पर्यटकांची संख्या वाढेल. हा दूरदृष्टिकोन ठेवत मुरुड शहराला अंबोली धरणातून पाणीपुरवठा होण्यासाठी ११ कोटी ५६ लाख मंजूर करत शहरवासीयांना १० टक्के लोकवर्गणी भरावी लागू नये यासाठी विशेष प्रयत्न करून मंत्रिमंडळाकडून ती माफ करून घेतली. मुरुड शहरात समाज मंदिरे व तीर्थक्षेत्र अनुदान मिळवून देण्यात यशस्वी ठरल्याचे प्रतिपादन आमदार सुनील तटकरे यांनी केले.
तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, आतिकभाई खतीब, फैरोज घालटे, नगरसेवक संजय धुमाळ, बाबा दांडेकर, नितीन पवार, विजय पैर, मियॉजान कादरी, प्रभाकर पाटील, पं. स. सदस्य अनंता ठाकूर, पप्पू भगत, शहर अध्यक्ष हसमुख जैन व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तटकरे म्हणाले, सत्ता असो वा नसो निधीची कमतरता भासू देणार नाही. सर्व कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास ठेवून एकत्रित पक्षासाठी काम करण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
नितीमत्ता ठेवल्यास, लोकांचा विश्वास आपणाबरोबर राहील. लोक चांगल्या माणसाला नेहमीच साथ देतात. शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध असून येथे घड्याळाचा गजर झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अतिकभाई खतीब यांनी मुंबईला आता जास्त जावू नये, मुरुड शहरात राहून शहराची घडी व्यवस्थित हाताळावी अशी विनंती सूचना यावेळी केली. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी, शहरातील अंतर्गत रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे आहे, स्मशानभूमी सुशोभिकरण, दत्त मंदिर निवासस्थान येथील कामे अर्धवट राहिली असून निधी उपलब्ध असून सुद्धा ही कामे पूर्ण न करता आल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)

Web Title: 11 crores 56 lacs approved for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.