‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 03:53 AM2018-01-26T03:53:30+5:302018-01-26T03:53:33+5:30
दक्षिणेकडील थोर संगीतकार गणतेशिकन ऊर्फ इल्याराजा, रामपूर साहसवन घराण्याचे ज्येष्ठ हिंदुस्तानी शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खान आणि केरळमधील ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ परमेश्वरन यांना यंदाचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार गुरुवारी रात्री जाहीर झाला. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान यंदा कोणालाही जाहीर झाला नाही.
नवी दिल्ली : दक्षिणेकडील थोर संगीतकार गणतेशिकन ऊर्फ इल्याराजा, रामपूर साहसवन घराण्याचे ज्येष्ठ हिंदुस्तानी शास्त्रीय गायक
गुलाम मुस्तफा खान आणि केरळमधील ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ परमेश्वरन यांना यंदाचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार गुरुवारी रात्री जाहीर झाला. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान यंदा कोणालाही जाहीर झाला नाही.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्र सरकारने एकूण ८५ ‘पद्म’ पुरस्कारांच्या मानक-यांची यादी जाहीर केली. त्यात ११ मानकरी महाराष्ट्रातील आहेत. तिघांना ‘पद्मविभूषण’, नऊ जणांना ‘पद्मभूषण’ व ७३ जणांना ‘पद्मश्री’ जाहीर झाली. आॅनलाइन पद्धतीने आलेल्या ३५ हजार नामांकनांमधून हे विजेते निवडले गेले. प्रसिद्धी आणि सन्मान यापासून दूर राहून इतरांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाºयांना सन्मानित करणे सरकारने गेल्या वर्षीपासून सुरू केले. त्यानुसार यंदा २२ जणांचा ‘पद्मश्री’ने सन्मान करण्यात आला.
‘पद्मभूषण’ मानकºयांमध्ये बिलियर्डस व स्नूकरचे विश्वविजेते खेळाडू पंकज आडवाणी, ख्रिश्चन धर्मगुरू फिलिपोस मार च्रिसोत्तम, क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी व रशियाचे भारतातील दिवंगत राजदूत अॅलेक्झांडर कडाकिन, तमिळनाडूतील शास्त्रज्ञ रामचंद्रन नागस्वामी, अमेरिकेत वास्तव्य करणारे साहित्यिक वेद प्रकाश नंदा, चित्रकार लक्ष्ण पै, ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांचा समावेश आहे.