राज्यात तीन अपघातांत ११ ठार
By admin | Published: June 28, 2015 03:00 AM2015-06-28T03:00:15+5:302015-06-28T03:00:15+5:30
राज्यात तीन वेगवेगळ्या अपघातांत शनिवारी ११ जणांचा मृत्यू झाला़ यामध्ये उस्मानाबादेतील सात, सोलापुरातील तीन आणि साताऱ्यातील एका बालिकेचा समावेश आहे़
उमरगा (जि. उस्मानाबाद ) : राज्यात तीन वेगवेगळ्या अपघातांत शनिवारी ११ जणांचा मृत्यू झाला़ यामध्ये उस्मानाबादेतील सात, सोलापुरातील तीन आणि साताऱ्यातील एका बालिकेचा समावेश आहे़
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुरोरी परिसरात आठवडी बाजार उरकून घराकडे परतणाऱ्या प्रवाशांच्या टमटमला हैदराबादहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव टँकरने जोरदार धडक दिली़ यात सात जण जागीच ठार, तर आठ गंभीर जखमी झाले.
पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन तुळजापूरच्या आई जगदंबेच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपला मोहोळपासून दीड किलोमीटर अंतरावर भरधाव ट्रकने धडक दिली़ यात तीन ठार तर १० जण जखमी झाले़ हा अपघात शनिवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास तांबोळे फाट्याजवळ घडला़ जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे़
या अपघातातील मृत व जखमी भाविक हे कोल्हापूर जिल्ह्यातील कंटेवाडी येथील आहेत़ सुनीता तानाजी डवर (३५), चालक लक्ष्मण सुरेश पाटील (२६) व छाया लघू पाटील (४०) अशी मृतांची नावे आहेत़