राज्यात ११ लाख शेतकरी पीक विमा लाभास अपात्र

By admin | Published: July 8, 2014 01:14 AM2014-07-08T01:14:10+5:302014-07-08T01:14:10+5:30

राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत राज्यातील ११ लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवित मदत नाकारण्यात आली आहे. केवळ २ लाख ८६ हजार ८०१ शेतकरी मदतीस पात्र दाखविण्यात आले असून त्यांना नुकसानभरपाईपोटी ८७ कोटी

11 lakh farmers in the state are not eligible for crop insurance | राज्यात ११ लाख शेतकरी पीक विमा लाभास अपात्र

राज्यात ११ लाख शेतकरी पीक विमा लाभास अपात्र

Next

आठ जिल्ह्यांंना भोपळा : ३ लाख शेतकऱ्यांना ८७ कोटींचा लाभ
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत राज्यातील ११ लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवित मदत नाकारण्यात आली आहे. केवळ २ लाख ८६ हजार ८०१ शेतकरी मदतीस पात्र दाखविण्यात आले असून त्यांना नुकसानभरपाईपोटी ८७ कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे.
राज्यात २०१३-१४ मध्ये राष्ट्रीय पीक विमा योजना राबविण्यात आली. १४ लाख ८३ हजार ९६३ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. गतवर्षी खरिपात अतिवृष्टी, त्यानंतर परतीच्या पावसाचा फटका आणि रबीत गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा होती. अनेक दिवसांपासून शेतकरी अडचणीत सापडले होते. त्यामुळे पीक विमा रकमेची आतुरतेने वाट बघत होते. अखेर पीक विमा कंपनीने मदत जाहीर केली.
त्यात सोयाबीन उत्पादक सर्वाधिक १ लाख २२ हजार ३२० शेतकरी, कापूस उत्पादक १३ हजार ३६३ आणि बाजरी, उडीद, मूग, ज्वारी, तुरीसह इतर पिकांना मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील १४ लाख शेतकऱ्यांनी ७९ कोटी १० लाख ८५ हजार २४० रूपयांचा विमा हप्ता भरला होता. यातील ११ लाख शेतकरी मदतीस अपात्र ठरले आहेत. तर २ लाख ८६ हजार ८०१ शेतकरी पात्र ठरले आहेत.
आठ जिल्ह्यांना भोपळा
राज्यातील आठ जिल्ह्यांना या योजनेतून छदामही मिळाला नाही. यामध्ये गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, उस्मानाबाद, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. या ठिकाणच्या ९७ हजार ११४ शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी ११ कोटी ४७ लाख रूपयांचा विमा उतरविला होता.
यवतमाळला ३४ कोटी
यवतमाळ जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार ४१७ शेतकऱ्यांनी १९ कोटी ८९ लाख ३१ हजार रूपयांचा विमा काढला होता. यातील ९७ हजार ९०६ शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. १ लाख ५९ हजार शेतकऱ्यांना मदतीस मुकावे लागणार आहे. पात्र शेतकऱ्यांना ३४ कोटी ६८ लाख ६८ हजार १६८ रूपयांची मदत दिली जाणार आहे.

Web Title: 11 lakh farmers in the state are not eligible for crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.