उजनी प्लसकडे, चार दिवसात ११ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:40 PM2017-07-19T14:40:54+5:302017-07-19T14:40:54+5:30

-

Up to 11 percent of water stock in Ujani Plate, four days | उजनी प्लसकडे, चार दिवसात ११ टक्के पाणीसाठा

उजनी प्लसकडे, चार दिवसात ११ टक्के पाणीसाठा

Next


सिध्देश्वर शिंदे : आॅनलाइन लोकमत
बेंबळे : पुणे जिल्ह्यातील १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे उजनीत बंडगार्डन व दौंड येथून पाण्याचा विसर्ग येण्यास सुरुवात झाल्याने उजनी धरणात गेल्या चार दिवसात जवळपास ११ टक्के पाणीसाठा वाढला आहे़ सध्या उजनी धरणात दौंड येथून १३,५८६ क्युसेक्सचा विसर्ग मिसळत आहे़ त्यात कमी झालेल्या बंडगार्डनच्या विसर्गात सकाळपासून वाढ झाली असून, सायंकाळपर्यंत उजनी धरण प्लसमध्ये येणार आहे.
गेल्या चार दिवसांपासून वरील १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे उजनीत जवळपास ७ टीएमसी पाणी वाढले आहे़ या पावसामुळे गेल्या तीन महिन्यांपासून उजनीला पडलेला मायनसचा विळखा आज सायंकाळपर्यंत निखळला़
उजनी धरण प्लसमध्ये येणे म्हणजे एकप्रकारचे धरण भरण्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे़ सध्या उजनी धरणातून थोड्याफार प्रमाणात पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे़ त्यात पाऊस नियमितपणे पडू लागल्याने त्या धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे़ म्हणून १९ पैकी १९ धरणांतून पाण्याचा विसर्ग चार-पाच दिवसात मोठ्या प्रमाणात चालू होण्याची दाट शक्यता आहे़ सोलापूर जिल्ह्यात पावसाने आणखी ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण झाले असले तरी उजनीत दौंडमधून विसर्ग येऊ लागला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे़ उजनी गेल्या वर्षापेक्षा जवळपास एक महिना अगोदर प्लसमध्ये येत आहे़ कारण गेल्या वर्षी उजनी धरणात पाणी लवकर येण्यास सुरुवात झाली आहे़
---------------
सोशल मीडियात फक्त उजनीची चर्चा
सध्या सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांत फक्त उजनी धरणाच्या पाणीसाठ्याबाबत चर्चा होत आहे़ प्रत्येक शेतकऱ्याला उजनीत पाणी किती येतेय? किती टक्के झाले? मायनसमधून प्लसमध्ये कधी येणार? पुण्यात पाऊस चालू आहे काय? किती दिवस पाणी येत राहील? पाणीसाठा किती झाला? आणखी किती होऊ शकेल? अशा एक ना अनेक प्रश्नांची चौकशी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे़ उजनी धरण सोलापूर, उजनी धरण संघर्ष समिती आदींसारख्या ग्रुपमध्ये याची सतत चर्चा सुरू आहे़ अशा ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यासाठी अ‍ॅडमिनला विनंत्या केल्या जात आहेत़
एक नजर
- आज उजनी धरणाची पाणीपताळी ४९०़६४० मी़
- एकूण पाणीसाठा: १७२७़१९ दलघमी
- उपयुक्त पाणीसाठा: ७५़६२ दलघमी
-टक्केवारी:- ४़९८ टक्के (मायनस)
- विसर्ग: दौंड १३५८६ क्युसेक्स
- बंडगार्डन १९७२० क्युसेक्स

Web Title: Up to 11 percent of water stock in Ujani Plate, four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.