महापरिनिर्वाण दिनानिमित्त ११ विशेष एक्स्प्रेस, चैत्यभूमीवर येणा-या अनुयायांच्या सोयीसाठी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 05:25 AM2017-11-30T05:25:01+5:302017-11-30T05:25:22+5:30
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येतात. गर्दीचे नियोजन आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त
मुंबई : भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येतात. गर्दीचे नियोजन आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त ११ विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (३ विशेष), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / दादर ते सेवाग्राम-अजनी-नागपूर (६ विशेष) आणि सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (२ विशेष) अशा मार्गांवर विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष ट्रेनमुळे राज्यभरातून चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत येणे सोयीचे होणार आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटांनी प्रवास करावा, असे आवाहनही मध्य रेल्वेने केले आहे. या गाड्यांचा लाभ मध्य प्रदेश तसेच कर्नाटकातून येणाºया नागरिकांंना होणार आहे.
नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस विशेष एक्स्प्रेस
विशेष गाडी क्रमांक ०१२६२ नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी २३.५५ वाजता सुटेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२६४ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी ०७.५० वाजता सुटेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२६६ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी दुपारी १५.५५ वाजता सुटेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर-सेवाग्राम / अजनी /
नागपूर विशेष एक्स्प्रेस
विशेष गाडी क्रमांक ०१२४९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून ६ डिसेंबर रोजी दुपारी १६.०५ वाजता सुटेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून ६ डिसेंबर रोजी सायंकाळी १८.४० वाजता सुटेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२५३ दादर येथून ७ डिसेंबर रोजी (६ डिसेंबरच्या मध्यरात्री) ००.४० वाजता सुटेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२५५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून ७ डिसेंबर रोजी १२.३५ वाजता सुटेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ८ डिसेंबर रोजी १८.४० वाजता सुटेल.
विशेष गाडी क्रमांक ०१२५९ दादरवरुन ८ डिसेंबर (७ डिसें.च्या मध्यरात्री) ००.४० वाजता सुटेल.
सोलापूर-छत्रपती
शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाड्या
विशेष गाडी क्रमांक ०१३१५ सोलापूर येथून ५ डिसेंबर रोजी १७.२० वाजता सुटेल.
विशेष गाडी क्रमांक ०१३१६ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून ७ डिसेंबर रोजी (६ डिसेंबरच्या मध्यरात्री) ००.२५ वाजता सुटेल.
या गाड्यांना
२ अतिरिक्त द्वितीय श्रेणीचे डबे जोडणार
५ डिसेंबर रोजी भुसावळहून सुटणारी गाडी क्र. ५११५४ भुसावळ-मुंबई पॅसेंजर
७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईहून सुटणारी गाडी क्र. ५११५३ मुंबई-भुसावळ पॅसेंजर
५ डिसेंबर रोजी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसहून (कोल्हापूर) सुटणारी गाडी क्र. ११०३० कोयना एक्स्प्रेस
७ डिसेंबर रोजी मुंबईहून सुटणारी गाडी क्र. ११०२९ कोयना एक्स्प्रेस