अपघात रोखण्यासाठी अकरा हजार कोटी

By Admin | Published: January 26, 2016 03:13 AM2016-01-26T03:13:09+5:302016-01-26T03:13:09+5:30

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात मोठ्या प्रमाणावर नागरिकांना जीव गमवावा लागतो. अपघातांना आळा घालण्यासाठी देशभरातील महामार्गांवरील

11 thousand crores to prevent the accident | अपघात रोखण्यासाठी अकरा हजार कोटी

अपघात रोखण्यासाठी अकरा हजार कोटी

googlenewsNext

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात मोठ्या प्रमाणावर नागरिकांना जीव गमवावा लागतो. अपघातांना आळा घालण्यासाठी देशभरातील महामार्गांवरील ७२६ अपघातप्रवण क्षेत्र शोधली असून, उपायोजनांसाठी ११ हजार कोटींची तरतूद केल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
जळगावातील १६ हजार ५८२ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते सोमवारी झाले. गडकरी म्हणाले की, ‘राष्ट्रीय महामार्ग करण्यासाठी पूर्वी १५ हजार पीसीयूची असलेली अट शिथिल करून १० हजार केली. पूर्वी देशात ९६ हजार किमी असलेले राष्ट्रीय महामार्ग २६ जानेवारीपर्यंत दीड लाख किमीपर्यंत नेणार असल्याचे त्यांनी सांगितले. महसूलमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Web Title: 11 thousand crores to prevent the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.