विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला १.१० कोटीचे उत्पन्न; मागील वर्षीपेक्षा २७.६६ लाखांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 01:18 AM2018-02-04T01:18:46+5:302018-02-04T01:19:05+5:30

माघी यात्रेच्या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला भाविकांकडून १ कोटी १० लाख ३८ हजार ८२९ रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी २७ लाख ६६ हजार ७३३ रुपयांचे जादा उत्पन्न प्राप्त झाले आहे.

1.10 crore to Vitthal-Rukmini temple; 27.66 lakhs increase from last year | विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला १.१० कोटीचे उत्पन्न; मागील वर्षीपेक्षा २७.६६ लाखांची वाढ

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला १.१० कोटीचे उत्पन्न; मागील वर्षीपेक्षा २७.६६ लाखांची वाढ

Next

पंढरपूर (जि. सोलापूर) : माघी यात्रेच्या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला भाविकांकडून १ कोटी १० लाख ३८ हजार ८२९ रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी २७ लाख ६६ हजार ७३३ रुपयांचे जादा उत्पन्न प्राप्त झाले आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने माघी यात्रेनिमित्त भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी नियोजन करण्यात आले होते. श्री विठ्ठलाच्या पायावर १५ लाख ५० हजार ६ रुपये, रुक्मिणी मातेच्या पायावर ४ लाख ४१ हजार ५७६ रुपये, अन्नछत्र देणगीतून २ लाख १६ हजार १०३ रुपये, पावती स्वरूपातील देणगीतून ४१ लाख ५३ हजार २७० रुपये, बुंदी लाडू प्रसाद विक्रीतून १८ लाख ६८ हजार ८८ रुपये, राजगीरा लाडू विक्रीतून ४ लाख ७७ हजार ५२० रुपये, फोटो विक्रीतून ४४ हजार ३५० रुपये, भक्त निवास देणगीतून २ लाख ९७ हजार ६३५ रुपये, नित्यपूजा १ लाख ७५ हजार रुपये, विठ्ठल विधी उपचार ८ हजार रुपये, हुंडी पेटीतून ६ लाख ५४ हजार ५१० रुपये, परिवार देवता व दक्षिणा पेटीतून ४ लाख १७ हजार २७६ रुपये, आॅनलाइन देणगीतून १ लाख ३६ हजार ६१७ रुपये तर अन्य स्वरूपातून ५ लाख ९८ हजार ८८१ रुपये असे १ कोटी १० लाख ३८ हजार ८२९ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
- मागील वर्षी माघी यात्रेच्या काळात ८२ लाख ७२ हजार ९६ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
- माघ शुद्ध १ ते माघ शुद्ध १५ या कालावधीत ३ लाख ६४ हजार ८८४ भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
- यामध्ये १ लाख ४५ हजार ७७१ भाविकांनी विठ्ठलाचे मुखदर्शन तर २ लाख १९ हजार ११३ भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेतले.

Web Title: 1.10 crore to Vitthal-Rukmini temple; 27.66 lakhs increase from last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.