रक्त तपासणीमुळे ७० महिन्यांच्या कालावधीत १११ जणांचे प्राण वाचले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 04:18 PM2019-06-13T16:18:44+5:302019-06-13T16:30:10+5:30

महाराष्ट्रातील सर्व रक्तपेंढीमध्ये नॅट चाचणीसारख्या आधुनिक रक्त तपासणीची गरज आहे..

111 people died due to blood tests during the 70-month period | रक्त तपासणीमुळे ७० महिन्यांच्या कालावधीत १११ जणांचे प्राण वाचले

रक्त तपासणीमुळे ७० महिन्यांच्या कालावधीत १११ जणांचे प्राण वाचले

googlenewsNext
ठळक मुद्देनॅटच्या मदतीने रक्त तपासणी : १३०० हून अधिक लोकंना एचआयव्ही संसर्गमहाराष्ट्रात एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या केसेसमध्ये हे प्रमाण १३ टक्के रक्त देण्यापूर्वी आवश्यक काळजी घेतली नसल्यास ' हे ' आजारही रुग्णाला होण्याची शक्यता

पुणे : राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्थेच्या नव्या अहवालानुसार मध्ये भारतात २०१८-१९ मध्ये संक्रमण संक्रमित संसर्ग (टीटीआय) प्रक्रियेत १३०० हून अधिक लोकंना एचआयव्ही संसर्ग झाला. महाराष्ट्रात एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या केसेसमध्ये हे प्रमाण १३ टक्के होते व १६९ जणांना संसर्ग झाला. जनकल्याण रक्तपेढीने नॅटच्या मदतीने रक्त तपासणीमुळे ७० महिन्यांच्या कालावधीत १११ जणांचे प्राण वाचवले आहेत. जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.     
यावेळी रॉश डायग्नॉस्टिक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रवण सुब्रमण्यम व  रॉश डायग्नॉस्टिक्स इंडियाचे मेडिकल व सायण्टिफिक अफेअर्स हेड डॉ. संदीप सेवलीकर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील रक्तविषयक सुरक्षितता यावरील अहवालाच्या मते टीटीआयचा धोका कमी केला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील सर्व रक्तपेंढीमध्ये नॅट चाचणीसारख्या आधुनिक रक्त तपासणीची गरज आहे. भारतात अंदाजे २५०० रक्तपेढया आहेत.  त्यातील केवळ २/३ टक्के नॅट चाचणी  करतात. देशातील व राज्यातील अनेक रुग्णालये/रक्तपेढी  यांनी नॅट तपासणी प्रक्रिया राबवलेली नाही.
डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, रक्त संक्रमण हा इमर्जन्सी मेडिकल केअरचा महत्त्वाचा घटक आहे. इमर्जन्सीच्या वेळी पुरेसा रक्तपुरवठा होण्यासाठी सुनियोजित रक्त संक्रमण सेवेची गरज असते. यासाठी हे संपूर्ण क्षेत्र व विनामूल्य ऐच्छिक रक्तदानाची तयारी असणारे डोनर यांच्या वर्षभरातील सहयोगामुळेच हे केवळ शक्य होऊ शकते. सर्वांना सर्वंकष आरोग्यसेवा द्यायची असले तर प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित व दर्जेदार रक्ताचा पुरवठा होणे गरजेचे असते.

नॅट म्हणजे काय
एचआयव्ही, हिपेटायटिस-बी, हिपेटायटिस-सी, मलेरिया, सिफिलिस (गुप्तरोग) हे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरण्याचे जे विविध मार्ग आहेत. त्यातील रक्त हा एक प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे रक्त देण्यापूर्वी आवश्यक काळजी घेतली नसल्यास रक्ताबरोबर हे आजारही रुग्णाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.एखादा व्यक्ती रक्तदान करण्याअगोदर त्याच्या रक्ताची तपासणी केली जाते. त्याच्या रक्तातून काही विषाणू आढळले. तर त्याला रक्तदान करून दिले जात नाही. व त्या व्यक्तीला रक्तातील दोषाबद्दल कळवले जाते. हे  नॅट चाचणी तपासणीचे माध्यम आहे. 

Web Title: 111 people died due to blood tests during the 70-month period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.