११३ ग्राम पंचायतमध्ये सार्वत्रिक, ५०८४ रिक्त सदस्यपदांची पोटनिवडणूक जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 08:36 PM2019-11-04T20:36:28+5:302019-11-04T20:36:40+5:30

आयोगाचा कार्यक्रम : १२३ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त थेट सरपंचपदाचीही निवडणूक

In 113 Gram Panchayat general election and 5084 seats by election declared | ११३ ग्राम पंचायतमध्ये सार्वत्रिक, ५०८४ रिक्त सदस्यपदांची पोटनिवडणूक जाहीर 

११३ ग्राम पंचायतमध्ये सार्वत्रिक, ५०८४ रिक्त सदस्यपदांची पोटनिवडणूक जाहीर 

Next

अमरावती : राज्यात  १४ डिसेंबर २०१९ ते ३१ मार्च २०२० दरम्यान मुदत संपणाºया ११३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक, १२३ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेले थेट सरपंचपदाची पोटनिवडणूक, तसेच ३१५२ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असणाºया ५,०८४ सदस्यपदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने सोमवारी जाहीर केला. या सर्व ठिकाणी ८ डिसेंबर रोजी मतदान, तर ९ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.


 निवडणुकीची सर्व प्रक्रिया संगणकीकृत पद्धतीने राबविली जाणार आहे. संबंधित सर्व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव करणारी कोणतीही कृती, घोषणा, मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाºयांना आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही. यासर्व ठिकाणी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.


राज्यात ठाणे जिल्ह्यात ९ ग्रामपंचायती, रायगड ५, रत्नागिरी ६, नाशिक ४८, जळगाव ६, अहमदनगर १, पुणे १३, सातारा १३, कोल्हापूर २, सोलापूर २, उस्मानाबाद २, बीड १, वर्धा ३ व गडचिरोली जिल्ह्यात ५ अशा एकूण ११३ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
संबंधित तहसिलदारांद्वारा ६ नोव्हेंबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागविणे व सादर करणे -१६ ते २१ नोव्हेंबर (रविवार वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत), उमेदवारी अर्जाची छाननी - २२ नोव्हेंबर, उमेदवारी अर्जाची माघार- २५ नोव्हेंबर, उमेदवारांना चिन्ह वाटप - २५ नोव्हेंबर, मतदान- ८ डिसेंबर व मतमोजणी ९ डिसेंबरला जिल्हाधिकाºयांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील, त्या ठिकाणी होणार आहे.

विभागनिहाय रिक्त ग्रा.पं. सरपंच व सदस्यपदे
विभाग        सरपंच        सदस्य
कोकण        २८        ७२९
नाशिक        ०९        ७१९
पुणे        ३९        १७५९
औरंगाबाद    २२        ६५४
अमरावती    २०        ६८९
नागपूर        ०५        ५३४
एकूण        १२३        ५०८४

Web Title: In 113 Gram Panchayat general election and 5084 seats by election declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.