114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला होणार मतदान, राज्य निवडणूक आयुक्तांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 05:42 PM2017-08-22T17:42:38+5:302017-08-22T17:45:05+5:30

राज्यातील विविध जिल्ह्यांतील ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी तारीख निश्चित

114 polling stations will be held on September 23, the State Election Commissioner announced | 114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला होणार मतदान, राज्य निवडणूक आयुक्तांनी केली घोषणा

114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला होणार मतदान, राज्य निवडणूक आयुक्तांनी केली घोषणा

Next
ठळक मुद्देराज्यातील विविध जिल्ह्यांतील ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी तारीख निश्चितऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या अशा 114 ग्रामपंचायतींसाठी  23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार

मुंबई, दि. 22- राज्यातील विविध जिल्ह्यांतील ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी तारीख निश्चित झाली आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या अशा 114 ग्रामपंचायतींसाठी  23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी याबाबत घोषणा केली. 

संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात अचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 4 ते 8 सप्टेंबर 2017 या कालावधीत सुट्टीचा दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 13 सप्टेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. 23 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यात मात्र दुपारी 3.00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. यानंतर सर्व ठिकाणची मतमोजणी 25 सप्टेंबर 2017 रोजी होईल, अशी माहिती  राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.

कोणत्या ग्राामपंचायतींमध्ये होणार मतदान-   
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी:
पालघर- 8, नाशिक- 22, नंदुरबार- 1, अहमदनगर- 8, पुणे- 1, औरंगाबाद- 4, नांदेड- 4, उस्मानाबाद- 1, जालना- 40, हिंगोली- 13, यवतमाळ- 7, चंद्रपूर- 4 आणि गडचिरोली- 1. एकूण- 114. 

Web Title: 114 polling stations will be held on September 23, the State Election Commissioner announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.