माध्यान्ह भोजनाची ११५ विद्यार्थ्यांना विषबाधा; २ गंभीर
By admin | Published: January 4, 2015 02:46 AM2015-01-04T02:46:09+5:302015-01-04T02:46:09+5:30
तालुक्याच्या कोर्टी येथील शिवाजी विद्यालयातील ११५ विद्यार्थ्यांना शनिवारी शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली.
सोलापुरातील घटना
करमाळा (सोलापूर) : तालुक्याच्या कोर्टी येथील शिवाजी विद्यालयातील ११५ विद्यार्थ्यांना शनिवारी शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली. त्यापैकी ६४ जणांवर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात तर ४९ जणांवर कोर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
माध्यान्ह भोजनाचा शिजवलेला भात खाल्ल्याने तब्बल ११५ विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या. मुख्याध्यापक छगन माने व इतर शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना तातडीने कोर्टीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे सर्वच विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर ६६ विद्यार्थ्यांना उपचारासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यातील दोन विद्यार्थ्यांची
प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. (वार्ताहर)
च्कोर्टी येथील शिवाजी विद्यालयात सकाळी शिजवलेल्या भाताचा कुबट वास येत असल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले होते, पण
याकडे कोणी लक्ष दिले नाही, असे सांगितले गेले.
च्शालेय पोषण आहार निकृष्ट असल्याचा व विद्यालयाच्या संस्थेत पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट असल्याने हा प्रकार झाला असावा, असा बाधित विद्यार्थ्यांच्या पालकांचा सूर होता.