११६पॅरा टॅरोटोरियल बटालियनच्या जवानाचा अपघातात मृत्यू; लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 05:22 PM2017-09-06T17:22:53+5:302017-09-06T17:52:04+5:30
गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी रात्री पत्नी व मुलासह देवळाली कॅम्पमार्गे भगूर परिसरातील शिंगवेबहुला येथे घरी दुचाकीवरून जात असताना मोटारीने पाठीमागून जोरदार धडक दिली.
नाशिक : गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी रात्री पत्नी व मुलासह देवळाली कॅम्पमार्गे भगूर परिसरातील शिंगवेबहुला येथे घरी दुचाकीवरून जात असताना मोटारीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत योगेश कचरू गवळी (३३) यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला तर पत्नी व दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत गवळी यांच्या मृतदेहावर शिंगवेबहुला गावात शोक ाकूल वातावरणात शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गवळी हे ११६ पॅरा टॅरिटोरियल सैन्य बटालियनमध्ये सैनिक म्हणून लष्करात सेवेत होते. महिनाभराची सुटी घेऊन ते पत्नी माधुरी व सहा वर्षीय मुलगी गिरिजा आणि तीन वर्षीय अवंती यांच्यासह रात्री नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आले. तेथून दुचाकीवरून जात असताना लॅमरोडवर एसव्हीकेटी महाविद्यालयासमोर गतिरोधकावर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून इनोव्हा (एमएच .०४ जी.सी १२५) मोटारीने जोरदार धडक दिली. या धडकेत गवळी व त्यांची पत्नी, मुलगी खाली कोसळले. रात्री अकरा वाजेच्या सुमारास एसव्हीकेटी महाविद्यलयाजवळ आपल्या दुचाकीचा वेग गतिरोधक जवळ आल्यामुळे गवळी यांनी कमी केला; मात्र याचवेळी पाठिमागून येणाºया मोटारचालकाच्या सदर बाब लक्षात आली नाही. त्यामुळे त्याने वेग नियंत्रणात आणला नाही आणि गवळी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. जखमी अवस्थेत गवळी यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलीला नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले; मात्र या डॉक्टरांनी गवळी यांना तपासून मयत घोषित केले. सदरचे वृत्त लष्करी विभागाला समजताच टी.ए.बटालियनच्या अधिकाºयांनी गवळी यांचे पार्थिव धोंडीरोड मार्गावरील लष्करी शवगृहात ठेवले.
सकाळी वरिष्ठ लष्करी अधिकाºयां उपस्थितीत कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून गवळी यांचे पार्थिव शिगवे बहुला येथे नेण्यात आले. सकाळपासूनच गावात शोकाकुल वातावरण होते.दुपारी पार्थिव गावात येताच वातावरण अधिकच भावूक झाले होते.येथील स्मशानभूमीत लष्कराच्या वतीने अधिकाºयांनी पुष्पचक्र अर्पण केले. जवानांनी बंदुकीच्या तीन फैºया झाडून गवळी यांना अखेरची मानवंदना दिली. गवळी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी दोन मुली, भाऊ, बहीण असा परिवार आहे. ‘दिव्य मराठी’चे छायाचित्रकार अशोक गवळी यांचे ते बंधू होत.