अकरावीची प्रवेशप्रक्रिया 22 जूनपासूनच- विनोद तावडे
By admin | Published: June 20, 2017 04:24 PM2017-06-20T16:24:09+5:302017-06-20T16:45:16+5:30
करावीची प्रवेशप्रक्रिया 22 जूनपासून सुरू करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया 22 जूनपासून सुरू करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केली आहे. अकरावीची प्रवेशप्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी उद्याच्या दिवसात दूर करणार असून, परवापासून ऑनलाइन प्रवेश प्रकिया सुरळीत होईल, असंही विनोद तावडे म्हणाले आहेत. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गणितात नापास म्हणजे आयुष्यात नापास असं होत नाही. गणिताला पर्यायी विषयच ठेवणार, असंही विनोद तावडेंनी स्पष्ट केलं आहे. गणिताला पर्यायी विषय ठेवण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचं आश्वासनंही तावडेंनी दिलं आहे. तत्पूर्वी कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी किंवा व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी गणिताची अजिबात आवश्यकता नसते. त्यामुळे इयत्ता दहावीत हा विषय ऐच्छिक ठेवण्याचा विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य शिक्षण मंडळाला सोमवारी केली होती.
(आर्ट्सला जायचेय, तर गणित कशाला?)
जुनी पद्धत पुन्हा अंमलात आणा
गणित किंवा गणिताशिवाय सात विषयांत उत्तीर्ण झाल्यास, पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची परवानगी यापूर्वी राज्य शिक्षण मंडळ देत होते. त्यांनी (शिक्षण मंडळ) हे बंद करण्याचा निर्णय का घेतला, हे कळत नाही. जुनी पद्धत पुन्हा एकदा अंमलात आणण्याचा विचार करा, असे म्हणत न्यायालयाने तज्ज्ञांकडून याबाबत सल्ला घेण्याची सूचनाही राज्य सरकारला केली.