नागपुरचे अकरावी प्रवेश पुण्यातून होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2017 10:32 PM2017-01-09T22:32:27+5:302017-01-09T22:32:27+5:30
नवीन शैक्षणिक सत्रापासून नागपूर विभागातील अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेतून केंद्रीय प्रवेश समिती हद्दपार होणार
Next
id="yui_3_16_0_ym19_1_1483968804564_51865">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 09 - नवीन शैक्षणिक सत्रापासून नागपूर विभागातील अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेतून केंद्रीय प्रवेश समिती हद्दपार होणार असून नागपुरातील प्रवेशाची गुणवत्ता यादी पुण्यातून तयार होणार आहे. विशेष म्हणज सर्व प्रक्रिया ‘आॅनलाइन’ राहणार असून विज्ञान, द्विलक्षीसोबतच कला, वाणिज्य व ‘एमसीव्हीसी’चे प्रवेशदेखील याच प्रक्रियेतून होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जून महिन्यात अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांची यादी ‘आॅनलाइन’च पाहता येईल. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारावर त्यांची गुणवत्ता यादी तयार होईल. त्यानंतर त्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल. जर विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाल्यावर अभ्यासक्रम व महाविद्यालय बदलायचे असेल तर दुस-या फेरीत त्यांना त्यासाठी प्रयत्न करता येतील. अंतिम गुणवत्ता यादी पुण्यातून जाहीर करण्यात येईल.
या निर्णयामुळे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला दिलासा मिळाला आहे. ‘आयआयटी-जेईई’, ‘नीट’चे ‘कोचिंग क्लास’चे महाविद्यालयांसोबत साटेलोटे आहे. परंतु या निर्णयामुळे काही महाविद्यालयांतील जागा रिकाम्या राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यात चिंता वाढली आहे. यासंबंधात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या अधिकाºयांशी संपर्क केल्यानंतर त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. यासंबंधात पुढील आठवड्यात अधिकृत निर्देश येतील, अशी माहिती त्यांनी दिली.