उस्मानाबादमध्ये दलित-सवर्ण वादात १२-१३ जणांना मारहाण

By Admin | Published: August 1, 2015 09:25 AM2015-08-01T09:25:32+5:302015-08-01T09:33:57+5:30

उस्मानाबाद जिल्ह्यात अनसुरडा गावात दलित-सवर्ण वाद चिघळून ग्रामस्थांनी दलित वस्तीवर हल्ला करत १२ -१३ जणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

12-13 people killed in Osmanabad's Dalit-Sarabha dispute | उस्मानाबादमध्ये दलित-सवर्ण वादात १२-१३ जणांना मारहाण

उस्मानाबादमध्ये दलित-सवर्ण वादात १२-१३ जणांना मारहाण

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

उस्मानाबाद, दि. १ -  उस्मानाबाद  जिल्ह्यात अनसुरडा गावात दलित-सवर्ण वाद चिघळून ग्रामस्थांनी दलित वस्तीवर हल्ला करत १२ -१३ जणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एक नागरिक गंभीर जखमी झाला आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून अनसुरडा गावाता दलित व सवर्णांदरम्यान वाद सुरू आहे. याआधी दलितांवर बहिष्कारही टाकम्यात आला होता, मात्र प्रशानातील अधिका-यांनी दोन्ही समाजात सलोखा निर्माण केला. 

पण काल हा वाद पुन्हा चिघळला आणि सवर्णांनी दलित वस्तीवर हल्ला करत त्यांना मारहाण केली. १२-१३ जखमींना उपचारांसाठी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.

 

Web Title: 12-13 people killed in Osmanabad's Dalit-Sarabha dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.