बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भुजबळांसह 12 जणांवर गुन्हे दाखल
By admin | Published: May 26, 2016 10:04 PM2016-05-26T22:04:16+5:302016-05-26T22:04:16+5:30
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
Next
डिप्पी वांकाणी
मुंबई, दि. 26- महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुरुवारी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांसह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुजबळ कुटुंबीयांनी उत्पन्नाच्या स्रोतापैकी 7152.50 टक्क्यांपेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ठपका ठेवला आहे. एसीबीच्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी 1999-2014पर्यंत स्वतःच्या कंपन्यांचे शेअर्स अवास्तव किमतीनं विकून 203.24 कोटींची मालमत्ता जमा केली. छगन भुजबळ, त्यांची पत्नी मीना भुजबळ, मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या समीर भुजबळ, सून विशाखा भुजबळ, सुनेचा सीए सुनील नाईक, हवाला ऑपरेटर सुरेश जजोडिया, प्रवीण जैन, संजीव जैन, सीएम चंद्रशेखर सर्डा, कपिल पुरी यांच्याविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 12 जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 13(1) ई आणि 13(2) गुन्हा नोंदवला आहे. एसीबीच्या मते, छगन भुजबळांनी 87 लाख 16 हजार 116 रुपयांची मालमत्ता पगारातून कमावली आहे. तर शेतीच्या माध्यमातून 1 कोटी 62 लाख 20 हजार 037 रुपयांची मालमत्ता जमवली आहे. तर त्यांची पत्नी मीना यांनी कृषी व्यवसायातून 36 लाख 88 हजार 322 रुपयांची मालमत्ता जमवली असून, त्यांची एकूण मालमत्ता 28624475 कोटींच्या घरात आहे. 1999-2014च्या दरम्यान भुजबळांकडे 3688322 कोटींची मालमत्ता आढळून आली असून, ती त्यांच्या उत्पन्नाच्या 32 टक्क्यांनी अधिक आहे. त्याप्रमाणेच पंकज भुजबळ आणि पत्नी विशाखा भुजबळांनी पगारातून 44 लाख 86 हजार 944 रुपयांची मालमत्ता कमावली आहे.
तर कृषी व्यवसायातून 23423549 कोटींची मालमत्ता कमावली आहे. मात्र एसीबीला 27910493 कोटींची मालमत्ता सापडली असून, ती त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोताच्या 45 ते 45.27 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. छगन भुजबळांनी हवाल्याचा पैसा लपवण्यासाठी पंकज, समीर भुजबळांच्या नावे बनावट कंपन्या स्थापन केल्या आणि कोलकात्यातल्या हवाला ऑपरेटरशी संपर्क साधून या बनावट कंपन्यांचे शेअर्स अवास्तव किमतीनं विकण्यात आले. हवाला ऑपरेटरनंही हे शेअर्स किमतीपेक्षा जास्त पैसे मोजून खरेदी केले. ईडीनं या प्रकरणाची चौकशी केली असता हे गुंतवणूकदार फक्त कागदोपत्री दाखवण्यात आले आहेत, मात्र ते अस्तित्वात नाहीत, ही माहिती चौकशीतून समोर आली आहे.