FRP न देणाऱ्या राज्यातील १२ कारखान्यांचे गाळप परवाने रद्द
By admin | Published: January 11, 2016 06:03 PM2016-01-11T18:03:29+5:302016-01-11T18:17:39+5:30
राज्यातील १२ साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात आले आहेत. FRP न देणाऱ्या कारखान्यांवर ही कारवाई केली आहे. अशी माहिती साखर आयुक्त विपिन शर्मांनी दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ११ - राज्यातील १२ साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात आले आहेत. FRP न देणाऱ्या कारखान्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती साखर आयुक्त विपिन शर्मांनी दिली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी न दिल्याने ७ कारखान्यान्यांना नोटिसा धाडण्यात आल्या आहेत तर १३ कारखाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी गाळप केलेल्या उसापोटी एफ.आर.पी.चे ३२८ कोटी रुपये थकविणाऱ्या राज्यातील ४४ साखर कारखान्यांवर केवळ कारवाईची भाषा केली जात होती पण आज साखर आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
यामद्ये नाशिक - गिरनार, सोलापूर - शंकर कुमादास, शंकर रत्न, नागपूर - अगस्ती वृद्धेश्वर प्रसाद शुगर, सांगली - महाकाली, माणगंगा, यशवंत खानापूर, सातारा - प्रतापगड, किसनवीर, पुणे - भीमा पाटस, या कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
साखर आयुक्तांनी मागील आठवड्यात एफ.आर.पी.नुसार पैसे न देणाऱ्या ५१ साखर कारखान्यांना गाळप परवाना रद्द करण्याची नोटीस बजावली होती.
मागील वर्षी (२०१४-१५) गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत न दिल्यास गाळप परवाना रद्द केला जाईल व आतापर्यंत केलेले गाळप विनापरवाना केले म्हणून कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी म्हटले होते. या नोटिसीनंतर जवळपास २१ साखर कारखान्यांनी पावणेदोनशे कोटी रुपये दिले.
मागील वर्षाचे पैसे न देणाऱ्या व यावर्षी गाळप हंगाम सुरू असलेल्या जवळपास ३० साखर कारखान्यांकडे २०० कोटींची रक्कम थकीत आहे. याशिवाय मागील वर्षी गाळप हंगाम घेतलेल्या व यावर्षी बंद असलेल्या १४ साखर कारखान्यांकडे १२५ कोटी थकले आहेत