१२ ‘मपोसे’ अधिकारी बनणार उपमहानिरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:28 AM2018-04-30T05:28:35+5:302018-04-30T05:28:35+5:30

मूळच्या उपअधीक्षक पदापासून उपायुक्त/अधीक्षक बनलेल्या राज्य पोलीस दलातील १२ अधिकाऱ्यांसाठी खूशखबर आहे. या अधिकाºयांची भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)मधील सेवाज्येष्ठता एक वर्षाने वाढविली आहे.

12 Deputy Municipal Commissioner will become the Mopssa Officer | १२ ‘मपोसे’ अधिकारी बनणार उपमहानिरीक्षक

१२ ‘मपोसे’ अधिकारी बनणार उपमहानिरीक्षक

Next

जमीर काझी
मुंबई : मूळच्या उपअधीक्षक पदापासून उपायुक्त/अधीक्षक बनलेल्या राज्य पोलीस दलातील १२ अधिकाऱ्यांसाठी खूशखबर आहे. या अधिकाºयांची भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)मधील सेवाज्येष्ठता एक वर्षाने वाढविली आहे. आता त्यांना लवकरच उपमहानिरीक्षक/ अप्पर आयुक्त म्हणून बढती मिळणार आहे. पदोन्नती करण्याबाबतचा प्रस्ताव तयार असून, गृहविभागाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करून केंद्राकडे पाठविला जाईल.
कोल्हापूरचे अधीक्षक संजय मोहिते, जळगावचे दत्ता कराळे, मुंबईतील सुप्रिया यादव, नवी मुंबईतील प्रवीण पवार यांचा त्यामध्ये समावेश आहे. अशा १२ अधिकाºयांना सध्या आयपीएसच्या २००५च्या बॅचमध्ये सामील केले होते. तथापि, केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाच्या (कॅट) आदेशानुसार, त्यांना २००४ या बॅचमध्ये सामील केले जाणार असल्याचे गृहविभागातील अतिवरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) उपअधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाल्यानंतर, त्यांना आयपीएस श्रेणी मिळण्यासाठी सुमारे १२-१३ वर्षे सेवा बजावावी लागते. भारतीय सेवेत समाविष्ठ झाल्यानंतर, तेथील ज्येष्ठतेनुसार त्यांना बढती दिले जाते. त्यानुसार, १९९२ला उपअधीक्षक म्हणून भरती झालेल्या या अधिकाºयांना २००५चे आयपीएस केडर देण्यात आले. मात्र, दरम्यानच्या कालावधीमध्ये ‘मपोसे’ कोट्यातून आवश्यक पदोन्नती न दिल्याने, काही अधिकाºयांनी याविरुद्ध ‘कॅग’मध्ये धाव घेतली. त्याला अनुकूलता दाखवित प्राधिकरणाने १९९२च्या एमपीएससी बॅचच्या अधिकाºयांना २००४चे आयपीएस केडर देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानुसार, सध्या विविध घटकांमध्ये अधीक्षक, उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले हे अधिकारी ज्येष्ठतेनुसार अप्पर आयुक्त/ उपमहानिरीक्षक म्हणून बढतीसाठी पात्र ठरले आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव तयार झाला असून, येत्या काही दिवसांत होणाºया अस्थापना मंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी दिली जाणार आहे.

या अधिकाºयांना बढती...
बी. जी. गायकर ,एस. बी. फुलारी, संजय मोहिते, सुनील कोल्हे, दत्ता कराळे, प्रवीण पवार, डॉ. प्रभाकर बुधवंत, सुप्रिया पाटील-यादव, ए.बी. रोकडे, डॉ. बी. जी. शेखर व संजयकुमार बाविस्कर यांची बढती होईल. याच बॅचमधील जयंत नाईकनवरे हे सध्या प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची बढती त्यांच्या कोट्यातून होईल.

यांना अजूनही प्रतीक्षा...
मूळसे मपोसेच्या १९९२च्या बॅचच्या अधिकाºयांना २००४ची श्रेणी मिळणार असल्याचे, आयपीएसच्या थेट २००५च्या बॅचमधील अधिकाºयांना बढतीसाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. या तुकडीमध्ये ठाणे ग्रामीण व पुणे ग्रामीणचे अधीक्षक अनुक्रमे विरेश प्रभू व सुवेझ हक, मुंबईतील परिमंडळ-१ उपायुक्त मनोजकुमार शर्मा, नाशिकचे ग्रामीणचे संजय दराडे, शारदा राऊत यांचा समावेश आहे.

Web Title: 12 Deputy Municipal Commissioner will become the Mopssa Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.