पंढरीत तयार होतोय तब्बल बारा लाख लाडूंचा प्रसाद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 03:08 PM2019-07-03T15:08:59+5:302019-07-03T15:11:04+5:30
तयारी आषाढीवारीची...भक्ती सोहळ्याची; ४ आचारी, ७० महिला व २० पुरुष लागले कामाला
पंढरपूर : पंढरपुरात आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेले लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचा प्रसाद म्हणून लाडू घेऊन जातात. यामुळे यात्रेत येणाºया गर्दीचा अंदाज घेत यंदा १२ लाख बुंदीचे लाडू बनविण्याचे काम सुरू आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून सुवर्णक्रांती महिला गृहउद्योग सहकारी संस्थेला लाडू बनविण्याचे काम देण्यात आले आहे. काही दिवसांवर आषाढी एकादशीचा सोहळा आहे. यामुळे पंढरीत लाखो भाविक दाखल होत आहेत. भाविक मोठ्या श्रध्देने विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू आपल्या गावी नेतात. मंदिर समितीने मागील वर्षीपेक्षा यंदा जादा २ लाख लाडू बनविण्याचे काम सुरु केले आहे. यामुळे १२ लाख लाडू बनविण्याचे नियोजन सुरु आहे. एकाच वेळी सर्व लाडू न बनविता मागणीनुसारच लाडू बनविण्यात येणार आहेत.
लाडू बनविण्याचे काम ४ आचारी, ७० महिला व २० पुरुष कर्मचाºयांमार्फत सुरूआहे. लाडू बनवत असताना अन्न व औषध विभागाकडून दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले जाते. यामध्ये सर्व कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करुन घेणे, डोक्याला कॅप वापरणे, अंतर्गत स्वच्छता ठेवणे या सूचनांचा सहभाग आहे. केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. दोन लाडूचे वजन अंदाजे १४० ग्रॅम इतके असते. हे लाडू मंदिर समितीला साडेबारा रुपयांना दिले जातात. मंदिर समिती दोन लाडूची पिशवी भाविकांना १५ रुपयांना विक्री करते. लाडू विक्रीतूनदेखील मंदिर समितीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते.
पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून येणाºया भाविकांना घरी लाडवाच्या रुपाने प्रसाद घेऊन जाता यावा या उद्देशाने मंदिर समितीच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
प्लास्टिकला छुट्टी, पर्यावरण पिशवीचा वापर
- लाडू प्रसाद विक्री करण्यासाठी प्लास्टिक पिशवी न वापरता पर्यावरणपूरक पिशवी वापरण्यात येत आहे. बुंदीचा लाडू भाविकांनी १० ते १२ दिवसांमध्ये खावा, अन्यथा तो लाडू खराब होऊ शकतो, असे कविता खडतरे यांनी सांगितले.
लाडूसाठी लागणारे साहित्य
- लाडूसाठी लागणारे साहित्य साखर - २० टन, तेल - २० टन, हरभरा - २५ टन, बेदाणा - १ टन, १ लाख रुपयांचे वेलदोडे , लाडूतील पौष्टिक तत्वे, ऊर्जा ४७६.४७ , प्रथिने ७.७५ टक्के, कर्बोदके ५५.३२ टक्के, चरबी २४.९१ टक्के