विकास अधिकाऱ्यांची १२ पदे जिल्ह्यात रिक्तच

By admin | Published: September 19, 2016 03:09 AM2016-09-19T03:09:04+5:302016-09-19T03:09:04+5:30

जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पालघर वगळता एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील अधिकाऱ्यांची १२ पदे रिक्त आहेत.

12 posts of development officials are vacant in the district | विकास अधिकाऱ्यांची १२ पदे जिल्ह्यात रिक्तच

विकास अधिकाऱ्यांची १२ पदे जिल्ह्यात रिक्तच

Next

रवींद्र साळवे,

मोखाडा- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पालघर वगळता एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील अधिकाऱ्यांची १२ पदे रिक्त आहेत. कुपोषण आटोक्यात आणण्यासाठी आदिवासी विभाग आरोग्य विभागाबरोबर एकात्मिक बाल विकास विभागाच्या अंगणवाडीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे परंतु पदच रिक्त असल्याने जिल्ह्यातील अंगणवाड्या पोरक्या झाल्या आहेत. त्यामुळे कुपोषण कसे आटोक्यात येणार असा प्रश्न निर्माण होत असून येत्या २१ तारखेला या विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे या भागाचा दौरा करणार आहेत या नंतर तरी ही रिक्त पदे भरली जातील का असा प्रश्न आहे. पालघर जिल्यात जव्हार, मोखाडा, पालघर, वसइर्, विक्र मगड , डहाणू, तलासरी, वाडा असे आठ तालुके असून जिल्ह्यात ७ हजार ५२९ बालके कुपोषणाने पीडित असून मोखाड्यात ४९३ बालके मुत्यूच्या दाढेत आहेत. जिल्हयात एका वर्षात ६०० बालके दगावली आहेत .
>भीषण वास्तव कळाले
मोखाड्यात जुलै महिन्यात १२ बालके कुपोषणाने दगावलीत सागर वाघ आणि ईश्वर सवरा या बालकांचा कुपोषणाने बळी घेतल्यानंतर कुपोषणाचे वास्तव समोर आले. आता तरी शहाणपण सुचून या कुपोषणावर उपाय योजना केली जाईल का असा सवाल आहे.

Web Title: 12 posts of development officials are vacant in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.