स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांंना १२ सत्र!
By Admin | Published: October 16, 2016 02:16 AM2016-10-16T02:16:42+5:302016-10-16T02:16:42+5:30
युनिसेफचे सहकार्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा उपक्रम.युनिसेफचे सहकार्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा उपक्रम.
हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि. १५-भारत सरकारने १ ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली असून, राज्यशासनाने १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत स्वच्छ शाळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.
मात्र शाळेतील विद्यार्थ्यांंंना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी विद्यार्थ्यांंंना मनोरंजक पद्धतीने १२ सत्रे देण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर मनोरंजक पद्धतीने राबविण्याचा १२ सत्राचा कार्यक्रम युनिसेफतर्फे तयार करण्यात आला असून हा उपक्रम १२ आठवडे चालणार आहे.
स्वच्छतेच्या सवयी विद्यार्थ्यांंंंना लागाव्यात यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून मनोरंजक पद्धतीने राबविण्याचे स्वातंत्र राज्यातील सर्वच शाळांना देण्यात आले आहे; मात्र उपक्रम राबविण्याची जबाबदारी सर्वच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांवर राहणार आहे. १ ते ७ व्या वर्गातील मुलांसाठी राबविण्यात येणार्या या सत्रामध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मनोरंजक पद्धतीने खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंंना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे.
हे आहेत स्वच्छतेचे १२ सत्र
१-चमकीला चेंडू, २-राजू-संजूची गोष्ट, ३-हात धुण्याचे गाणे, ४-साबणाने हात धुण्याची शर्यत, ५-हात, पाणी आणि साबण, ६-बिट्ट, ७-सोबती आणि साबण, ८-पाणी से साबून मिलाते चलो, ९-कचरा गोळा करून त्याचे व्यवस्थापन करण्याची शर्यत, १0-चूक की बरोबर ओळखणे, ११-जोड्या लावणे, १२-चालता बोलता
असे आहे स्वच्छतेचे गाणे
सर्वात आधी होतो..हात ओला
मग हातावर नाचतो..साबण रंगिला
शब्बास, हाताला मिळते मग..हाताची साथ
नंतर मग वळून पुढे मागे.. खेळे हात
असे, खेळा खेळा दहा ..बोटांत शिरून
मग चालवा नखांनी..छन छना छन चक्कर
हात करती पाण्यात..छमछम छम
कारण स्वच्छ हातामध्ये आहे दम
शाळेतील विद्यार्थ्यांंंंना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी विद्यार्थ्यांंंंना मनोरंजक पद्धतीने १२ सत्र देण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर उपक्रम जिल्ह्यातील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.
- अशोक सोनवने, शिक्षणाधिकारी,
बुलडाणा