निलंबित १२ आमदार मतदान करणार; पण विधान भवनाबाहेरून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 07:27 AM2021-09-22T07:27:19+5:302021-09-22T07:27:43+5:30
या १२ आमदारांच्या मतदानाबाबत अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला मागितला होता. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रजनी पाटील यांना तर भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.
मुंबई : राज्यसभेच्या ४ ऑक्टोबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या १२ निलंबित आमदारांना मतदानाचा हक्क असेल पण त्यांच्या मतदानासाठी विधान भवनाबाहेर विशेष व्यवस्था केली जाईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याबाबतचा आदेश काढला आहे.
या १२ आमदारांना विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एक वर्षासाठी निलंबित केले होते. त्यात, गिरीश महाजन, जयकुमार रावल, डॉ. संजय कुटे, आशिष शेलार, अतुल भातखळकर, योगेश सागर, हरिश पिंपळे, नारायण कुचे, पराग आळवणी, मितेश भांगडिया, राम सातपुते, अभिमन्यू पवार यांचा समावेश आहे. निलंबित असल्याने नियमांनुसार ते विधानभवन परिसरात प्रवेश करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी मतदानाची वेळ इतरांप्रमाणेच सकाळी ९ ते सायंकाळी ४ अशी असेल. त्यांच्या मतपत्रिका या अन्य मतपत्रिकांसोबत मिसळून मग मतमोजणी होईल.
या १२ आमदारांच्या मतदानाबाबत अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला मागितला होता. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रजनी पाटील यांना तर भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.