वेदांता कंपनीचा 12 हजार मेट्रीक टन खनिजाच्या वाहतुकीचा परवाना रद्द

By admin | Published: July 28, 2016 06:08 PM2016-07-28T18:08:30+5:302016-07-28T18:08:30+5:30

खाण खात्याने खनिजाच्या वाहतुकीसाठी परवानगी देताना ज्या अटी लागू केल्या होत्या, त्या अटींचे मुद्दाम वेदांता कंपनीने पालन केले नाही, असा ठपका ठेवून गोवा सरकारच्या खाण खात्याने

12 thousand metric tonne of mineral transport license canceled by Vedanta Company | वेदांता कंपनीचा 12 हजार मेट्रीक टन खनिजाच्या वाहतुकीचा परवाना रद्द

वेदांता कंपनीचा 12 हजार मेट्रीक टन खनिजाच्या वाहतुकीचा परवाना रद्द

Next

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. २८ : खाण खात्याने खनिजाच्या वाहतुकीसाठी परवानगी देताना ज्या अटी लागू केल्या होत्या, त्या अटींचे मुद्दाम वेदांता कंपनीने पालन केले नाही, असा ठपका ठेवून गोवा सरकारच्या खाण खात्याने या कंपनीला 12 हजार मेट्रीक टन खनिजाच्या वाहतुकीसाठी दिलेला आयात व वाहतूक परवाना रद्द केला आहे.

खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य यांनी गुरुवारी याबाबतचा लेखी आदेश जारी केला. कर्नाटकच्या खाण खात्याने केलेल्या ई-लिलावावेळी वेदांता लिमिटेड कंपनीने 12 हजार मेट्रीक टन खनिज माल (लंप्स) घेतला होता. 16 जुलै 2016 रोजी वेदांता लिमिटेड कंपनीने हा खनिज माल गोव्यात आणण्यासाठी आयात व वाहतूक परवाना गोव्याच्या खाण खात्याकडून घेतला.

परवाना देताना खाण खात्याने स्पष्ट अशी अट लागू केली होती. गोव्यातील या खनिज मालाच्या वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी मोले येथील तपास नाक्यावर या खनिज मालासाठी खाण खाते प्रवेश तिकीट देईल अशी अट होती. या खनिज मालाचा उपयोग फक्त स्थानिक वापरासाठी व्हावा असाही ही अट लागू करण्यामागिल हेतू होता. त्यासाठी या खनिज मालाच्या वाहतुकीवर लक्ष ठेवणो गरजेचे होते.

गेल्या 26 जुलै रोजी खाण खात्याने मोले तपास नाक्यावर आपला कर्मचारी वर्ग ठेवला पण त्या दिवशी तपास नाक्यावर वेदांताच्या खनिज मालाच्या ट्रकांची नोंदच झाली नाही. खाण खात्याला कोणतीही पूर्व कल्पना न देता वेदांताचे ट्रक गोव्यात आले व त्यांनी माल आमोणा येथील पिग आयर्न प्रकल्पाजवळ नेला. यामुळे खात्याने तत्काळ वेदांताचा 12,क्क्क् टन मालाबाबतचा आयात व वाहतूक परवाना निलंबित केला.

खाण खात्याच्या अधिका:यांची प्रतीक्षा देखील न करता हे ट्रक आमोणा येथे रिकामे केले गेले. खाण खात्याने केलेल्या सूचनांचे हे स्पष्टपणो उल्लंघन ठरते, असे खाण खात्याने म्हटले आहे. तसेच याची गंभीरपणो दखल घेऊन आयात व वाहतूक परवाना रद्दच केला. या कारवाईमुळे 12 हजार मेट्रीक टनमधील उर्वरित खनिज माल वेदांता कंपनी गोव्यात आणू शकणार नाही. नव्याने परवाना हवा असेल तर आतार्पयत आणून आमोणा येथे ठेवलेल्या खनिज मालाची वजन काटय़ावर मोजणी करून घ्यावी लागेल तसेच या मालाची इनवेन्टरी तयार करावी लागेल. वेदांताने आपल्या सूचनेचे मुद्दाम पालन केले नाही,असे खाण खात्याने म्हटले आहे.

Web Title: 12 thousand metric tonne of mineral transport license canceled by Vedanta Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.