१२ वर्षांचा दक्ष कसाऱ्यातून गायब
By admin | Published: July 7, 2015 10:15 PM2015-07-07T22:15:26+5:302015-07-07T22:15:26+5:30
कसारा येथे राहून आसनगाव (सावरोली) येथे शिक्षण घेणारा दक्ष रामदास खानझोडे हा १२ वर्षीय मुलगा २ जुलै पासून घरातून बेपत्ता झाला असून आजपावेतो तपास न लागल्याने
प्रगती जाधव-पाटील - सातारा -पुरूषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिलांना कुठेच तडजोड नको आहे. घर, नोकरी, समाज या तिन्ही आघाड्यांवर लढताना आणि स्वत:ला सिध्द करताना अनेक महिला ‘सुपर वुमन सिंड्रोम’च्या बळी पडू लागल्या आहेत. साताऱ्यातील सुमारे ८० टक्के महिलांमधील हे चित्र चिंताजनक आहे.जिल्ह्यात नोकरी करणाऱ्या महिलांचा टक्का वाढत असून त्यांच्यात ‘सुपर वुमन सिंड्रोम’ या आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. नोकरी आणि घर सांभाळताना महिलांची होणारी तारांबळ आणि प्रत्येक आघाडीवर ‘उत्कृष्ट’ ठरण्याचा हट्ट आता महिलांना खचवू लागला आहे. ‘तिला जमते तर मला का नाही’ ही भावना मनात जन्म घेते आणि मग पुढे सगळे द्वंद्व सुरू होते. घराबाहेर पडून महिला अर्थाजन करायला शिकली पण घरात असूनही पुरूष घरकाम नाही शिकला. नेमकी हीच गोष्ट महिला दुर्लक्ष करतात. महिला आणि पुरूषांमधील हा मोठा फरक आहे. घर म्हटलं की त्याची जबाबदारी माझीच ही महिलांची भावना असते. वास्तविक ही जबाबदारी विभागली गेली पाहिजे, ही मानसिकता घरात कोणाचीच नसते. कारण वर्षानुवर्षे हे काम महिलांच्या माथीच मारले गेले आहे.
(कोणत्या महिला आहेत याचा बळी, वाचा उद्याच्या अंकात.)
पुरूष कधी घेणार जबाबदारी
संसाराला हातभार किंवा करिअर म्हणून महिलांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कमावती बायको असावी अशी इच्छा व्यक्त करणारे उपवरही आहेत. पण तिच्या बरोबरीने संसाराची आणि घराची जबाबदारी घेणारे बोटावर मोजण्या इतपतच आहेत. बायकोचा पगार सेव्हिंगला टाकणाऱ्या काही पुरूष मंडळींना तिला मदत करणे कमीपणाचे वाटते. जसे महिला हे माझं काम आहे आणि ते मी केलं पाहिजे, असे जशी म्हणते, तसंच पुरूषांमध्ये या कर्तव्यांची जाणीव येणार कधी?
सुपर वुमन सिंड्रोम म्हणजे काय?
प्रत्येक ठिकाणी स्वत:ला अव्वल सिध्द करणं, कुठेही तडजोड न करणं आणि सगळ्याची जबाबदारी माझीच आहे, असे वाटणे ही सगळी लक्षणे सुपर वुमन सिंड्रोमची आहेत. समाजाने आपल्याला नावे ठेवू नयेत म्हणून महिला स्वत:च स्वत:विषयीच्या अपेक्षा वाढवून ठेवतात. जिथं महिला दोन आघाड्यांवर लढतात, तिथे हा त्रास होतो. यामुळे कालांतराने महिलांना पराभूत झाल्याची भावना निर्माण होते. अपयश किंवा परावलंबनाची त्यांना प्रचंड चिड येते. याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो.
सगळ्याच गोष्टींमध्ये मी अव्वल राहणार या अट्टहासापायी महिला स्वत:चे नुकसान करून घेते. पुरणाची पोळी नाही आली तर काय झालं इतरांपेक्षा अन्य बऱ्याच गोष्टी मी चांगल्या करू शकते, हा विचार महिलांमध्ये रूजणे आवश्यक आहे. सगळीकडे सर्वोत्तम राहण्याच्या अट्टहासापायी महानगरांमधील हे ‘सुपर वुमन सिंड्रोम’ आता साताऱ्यातही घराघरांत वाढू लागले आहे. याला कुटुंबातील सर्वांनी मिळून हद्दपार केले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने आपापल्या कामाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे.
- डॉ. राजश्री देशपांडे,
मानसोपचारतज्ज्ञ