राज्यात १.२० लाख रोजगार, ४० हजार कोटींची गुंतवणूक : पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे विशाल प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 11:58 AM2023-06-29T11:58:28+5:302023-06-29T11:59:05+5:30

Maharashtra: राज्यात ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असलेल्या आणि १ लाख २० हजार रोजगार निर्माण करणार असलेल्या विशाल प्रकल्पांच्या उभारणीला बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

1.20 lakh jobs in the state, investment of 40 thousand crores: Huge projects in Pune, Chhatrapati Sambhajinagar | राज्यात १.२० लाख रोजगार, ४० हजार कोटींची गुंतवणूक : पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे विशाल प्रकल्प

राज्यात १.२० लाख रोजगार, ४० हजार कोटींची गुंतवणूक : पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे विशाल प्रकल्प

googlenewsNext

मुंबई :  राज्यात ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असलेल्या आणि १ लाख २० हजार रोजगार निर्माण करणार असलेल्या विशाल प्रकल्पांच्या उभारणीला बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या उपस्थितीत ‘सह्याद्री अतिथीगृहा’वर ही बैठक झाली. 
बैठकीस वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.  

ईव्ही असणाऱ्यांचा फायदा
nपुणे, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई या भागांत ४० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे प्रकल्प उभारले जातील. 
nत्यात पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे देशातील पहिल्या सुमारे १२ हजार ४८२ कोटींच्या इलेक्ट्रिक व्हेईकल आणि बॅटरी निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. 

नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क 
जेम्स अँड ज्वेलरी आर्ट प्रमोशन कौन्सिलद्वारे  महापे; नवी मुंबई येथे इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क २१ एकर जागेवर उभारला जाईल. त्या ठिकाणी १३५३ औद्योगिक व व्यापारी आस्थापना सुरू होतील. या ठिकाणी २० हजार कोटींची गुंतवणूक व एक लाख प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होईल. या प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे.

कुठे कोणते प्रकल्प? 
पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे गोगोरो इंडिया प्रा.लि. कंपनीमार्फत इलेक्ट्रिक व्हेईकल व बॅटरी निर्मिती, तसेच स्वॅपिंग स्टेशनसाठीच्या पायाभूत सुविधांची उभारणी. हा देशातील असा पहिलाच प्रकल्प असेल. गोगोरो राज्यभरात सुमारे १२ हजार बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स स्थापन करणार आहे. 
छत्रपती संभाजीनगर येथे इलेक्ट्रिक व्हेईकल्स व बॅटरीची निर्मिती करणारी एथर एनर्जी कंपनी ८६५ कोटींच्या गुंतवणुकीतून प्रकल्प उभारेल. एथर एनर्जी ही भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन कंपनी आहे. जी प्रगत आणि कनेक्टेड इलेक्ट्रिक दुचाकी बनविते. 
पुणे येथे देशातील पहिल्या ई-बसनिर्मितीच्या ७७६ कोटी गुंतवणुकीच्या पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स प्रा.लि.च्या विशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली. तेथे इलेक्ट्रिक आणि  हायड्रोजन इंधन वाहननिर्मिती सुविधा उभारण्यात येणार आहे. 
रायगड येथे परफॉर्मन्स केमिसर्व कंपनीचा २७०० कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प, रायगड येथेच २०३३ कोटी गुंतवणुकीच्या स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज कंपनीचा प्रकल्प, नंदुरबार येथे  जनरल पॉलिफिल्म्स कंपनीचा ५०० कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प, सातारा येथे विप्रो परी रोबोटिक्स कंपनीचा ५४४ कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प, अहमदनगर येथे  ११० कोटी गुंतवणुकीचा गणराज इस्पात कंपनीचा प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली. 

Web Title: 1.20 lakh jobs in the state, investment of 40 thousand crores: Huge projects in Pune, Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.