१२०० ब्लॅक स्पॉट जाहीर
By Admin | Published: October 14, 2016 03:16 AM2016-10-14T03:16:40+5:302016-10-14T03:16:40+5:30
‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’असे सांगणाऱ्या एसटीचा प्रवास हा धोकादायक मार्गांवरूनच होत आहे. असलेले खड्डे, वळणदार रस्ते, यामुळे एसटी बसेसचा वेग कमी
मुंबई : ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’असे सांगणाऱ्या एसटीचा प्रवास हा धोकादायक मार्गांवरूनच होत आहे. असलेले खड्डे, वळणदार रस्ते, यामुळे एसटी बसेसचा वेग कमी होतानाच, बसेसना अपघातांना आणि त्यातील जीवितहानीला तोंड द्यावे लागते. राज्यात असे तब्बल १,२१0 ‘ब्लॅक स्पॉट’(धोकादायक ठिकाणे) असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून तयार करण्यात आली आहे. यामध्ये एकट्या मुंबई प्रदेशात (ठाणे जिल्हा, सिंधुदुर्ग) ३९२ ठिकाणे आहेत. यानंतर, नाशिक प्रदेश (नाशिक ते अहमदनगर,धुळे) आणि औरंगाबाद प्रदेशाचा नंबरही लागतो.
२0१४-१५ मध्ये एकूण ४९५ जण अपघातांत दगावले होते. यामध्ये एसटी प्रवासी, एसटी कर्मचारी व अन्य वाहनांमधील प्रवाशांना समावेश आहे. २0१५-१६ शी तुलना करता, या वर्षात ४0७ जण दगावले. हे प्रमाण फारच कमी असले पाहिजे, असे मत एसटीचे अधिकारी व्यक्त करतात. सरासरी वर्षाला जवळपास ४00 पेक्षा जास्त जण एसटीच्या अपघातात दगावतात. यामध्ये एसटी प्रवाशांच्या अपघातांचे प्रमाण साधारणपणे ६९ एवढे आहे. अपघात होऊ नये, यासाठी चालकांमध्ये महामंडळाकडून जनजागृती केली जाते. एकट्या मुंबई प्रदेशात ३९२ धोकादायक ठिकाणे असून, यामध्ये सिंधुदुर्गात १३६ व ठाणे जिल्ह्यात ७५ ठिकाणे असल्याचे समोर आले. त्यानंतर, नाशिक प्रदेशात २८६, औरंगाबाद प्रदेशात १९५ ठिकाणे आहेत. नाशिक प्रदेशात येणाऱ्या धुळेमध्ये ५0 ठिकाणे असल्याची माहिती देण्यात आली. यावर उपाययोजना करण्यासाठी एसटीकडून शासनाकडेही सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. (प्रतिनिधी)