एकट्या शिंदेंच्या खात्याला १२ हजार कोटी दिले; जयंत पाटलांनी आरोप खोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 11:06 PM2022-06-29T23:06:20+5:302022-06-29T23:06:54+5:30
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार अजित पवार त्यांना निधी देत नव्हते, असे आरोप करत आहेत. ते पूर्ण पणे खोटे आहेत. असे जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आज राजीनामा दिला. राज्याला एक चांगला मुख्यमंत्री लाभला होता. एक सच्चा, लोकांसाठी काम करणारा नेता. गेल्या अडीच वर्षांत आम्ही चांगले, लोकोपयोगी निर्णय घेतले, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठाकरेंची स्तुती केली. याचबरोबर एकनाथ शिंदेंच्या आरोपांवर देखील त्यांनी आकडे मांडले.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार अजित पवार त्यांना निधी देत नव्हते, असे आरोप करत आहेत. ते पूर्ण पणे खोटे आहेत. अनेक आमदारांना दोनशे- अडीचशे कोटी रुपये दिलेले आहेत. एकट्या एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्याला अजित पवारांनी अर्थसंकल्पात १२ हजार कोटी दिले होते. भाजपा तर सहा टक्क्यांपेक्षा जास्त देत नव्हते. ही आकडेवारी पूर्ण नाहीय, आणखी काही खात्यांचे आकडे यायचे आहेत, असे सांगत शिंदे रडीचा डाव खेळल्याचा आरोप पाटलांनी केला.
राष्ट्रवादीच्या आमदारांवरही अन्याय होत होता. परंतू पवारांनी हे सरकार बनविले म्हणून सारे आनंदात होते. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा येईन, कसा येईन ते आम्ही वेळ आली की विधानसभेत सांगू, असेही जयंत पाटील म्हणाले. शिंदे रडीचा डाव खेळले, एखाद्याला जायचेचे असेल तर तो काहीही आरोप करून जातो. काय ते हाटेल, झाडी वाल्यांनाही करोडोमध्ये निधी दिला, असे पाटील म्हणाले.