राज्यातील १२१ सरकारी वकिलांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 05:37 AM2018-06-11T05:37:30+5:302018-06-11T05:37:30+5:30
राज्यातील विविध न्यायालयांत कार्यरत असलेल्या १२१ सहायक सरकारी वकिलांच्या (गट-अ) प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत.
Next
मुंबई - राज्यातील विविध न्यायालयांत कार्यरत असलेल्या १२१ सहायक सरकारी वकिलांच्या (गट-अ) प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई व ठाणे जिल्ह्यातील १४ जणांचा समावेश असून, संबंधितांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे आदेश गृहविभागाने दिले आहेत.
राज्यातील अभियोग संचालनालयाच्या संचालकांच्या अखत्यारीत सहायक सरकारी वकिलांच्या नियुक्ती व बदलीचे प्रकरण हाताळण्यात येते. या विभागाकडून आलेल्या वार्षिक सर्वसाधारण बदल्यांबाबतच्या प्रस्तावाची शासनस्तरावर चौकशी करून बदल्यांचे आदेश जारी केले.