राज्यातील १२३ तालुके टंचाईग्रस्त!

By Admin | Published: August 14, 2014 03:43 AM2014-08-14T03:43:16+5:302014-08-14T03:43:16+5:30

सरासरीपेक्षा ५० टक्क्यांहून कमी पाऊस पडलेल्या राज्यातील १२३ तालुक्यांमध्ये टंचाईसदृश स्थिती जाहीर करण्यात आली आहे.

123 talukas scarcity in the state! | राज्यातील १२३ तालुके टंचाईग्रस्त!

राज्यातील १२३ तालुके टंचाईग्रस्त!

googlenewsNext

मुंबई : सरासरीपेक्षा ५० टक्क्यांहून कमी पाऊस पडलेल्या राज्यातील १२३ तालुक्यांमध्ये टंचाईसदृश स्थिती जाहीर करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टंचाईसदृश स्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये कृषीपंपांच्या वीज बिलांमध्ये ३३ टक्के सवलत, शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ आणि शेतसारा माफी या सवलती दिल्या जातील. टंचाईसदृश स्थिती जाहीर करताना जिल्हा हा निकष न ठरविता तालुका घटक निकष धरण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गेल्या बैठकीत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आक्रमक होत मराठवाड्यात दुष्काळी स्थिती जाहीर करण्याची मागणी केली होती. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 123 talukas scarcity in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.