...तर तुमचा वाहन परवाना कायमस्वरुपी रद्द होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 09:35 AM2020-01-13T09:35:08+5:302020-01-13T09:36:41+5:30

तीन महिन्यांत मुंबईतल्या १,२४७ जणांचे वाहन परवाने रद्द

1247 rash drivers lose their licences for 3 months repeat offenders likely to be banned from driving for life | ...तर तुमचा वाहन परवाना कायमस्वरुपी रद्द होणार

...तर तुमचा वाहन परवाना कायमस्वरुपी रद्द होणार

Next

मुंबई: गेल्या तीन महिन्यांत वाहतूक पोलिसांनी १ हजार २४७ जणांचे वाहतूक परवाने रद्द केले आहेत. बेदरकारपणे वाहन चालवल्यानं आणि सिग्नल तोडल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मुंबईत २ हजार ८१४ रस्ते अपघात झाले होते. त्यात ४०३ जणांचा मृत्यू झाला होता. 

ऑक्टोबर २०१९ मध्ये मुंबईतल्या वाहतूक पोलिसांनी आरटीओला एक प्रस्ताव दिला होता. त्यानंतर वाहन चालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी एक सूचना जारी केली होती. एखादी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्यास, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करत असल्यास, सिग्नल तोडत असल्यास त्याचा परवाना किमान तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात यावा, असं महाराष्ट्र पोलिसांनी सूचनेत म्हटलं होतं. 

वाहन परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आल्याची कारवाई झाल्यानंतरही बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाऊ शकतो. 'एखादी व्यक्ती वारंवार वाहतूक नियमांचं उल्लंघन करत असल्यास तिचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाईल,' अशी माहिती वाहतूक विभागाचे प्रवक्ते अभय देशपांडे यांनी दिली. 

ऑक्टोबर २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत राज्य वाहतूक विभागानं राज्यभरातल्या एकूण १० हजार ३५१ चालकांचे परवाने रद्द केल्याची आकडेवारी देशपांडे यांनी दिली. या १० हजार ३५१ चालकांमध्ये मुंबईतल्या १ हजार २४७ जणांचा समावेश आहे. यातील ४३० जणांचा परवाना वाहन चालवताना मोबाईलवर वापरल्यानं रद्द करण्यात आला आहे. तर ५२० जणांवर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यानं कारवाई झाली आहे. राज्यभरात १४ हजार ३५२ जणांचा परवाना वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असल्यानं रद्द करण्यात आला असून ४ हजार ७४७ जणांचे परवाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यानं रद्द करण्यात आले आहेत. 

Web Title: 1247 rash drivers lose their licences for 3 months repeat offenders likely to be banned from driving for life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.