देशातील १२५ कोटी जनतेला जगवणाऱ्यां शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न !
By सुरेश लोखंडे | Published: December 8, 2017 06:53 PM2017-12-08T18:53:12+5:302017-12-08T19:06:08+5:30
सुरेश लोखंडे
ठाणे : शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्यामुळे आपणास खायला मिळत आहे. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटूंबे अॅट्याक येऊन मरतील. देशातील १२५ कोटी जनतेला जगवणाºया शेतकऱ्यांना, शेतमजुरांना न्याय मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न सुरू आहेत. ३४ कोटींची कर्जमाफी देण्यात आली असून टप्याटप्याने त्याचा लाभा शेतकºयांना होईल. त्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी यांनी स्पष्ट केले.
ठाणे जि.प. व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचार दौऱ्यांसाठी आठवले आले असता ते शहापूर तालुक्यातील वासिंद येथील एका चौक सभेत बोलत होते. शेतकऱ्यांप्रमाणेच दलितांच्या महामंडळांचे सुमारे ८०० कोटींच्या कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासन विचार करीत असल्याचे त्यांनी यावेळी सुतोवाच केले. शेतीच्या सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी नदी जोड प्रकल्प हाती घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊन परिणामी देशाचा विकास साधता येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने नितीन गडकरी यांना नद्या जोडण्याची ... तर मला माणसे जोडण्याची जबाबदारी मिळाल्याचे त्यांनी हास्य विनाद करीत स्पष्ट केले.
आमच्या मतांवर आम्ही पडतो... पण ताबडतोब उभे राहतो. पडून राहण्याची सवय आम्हाला नाही... असा विनोद करीत... ते पुढे म्हणाले की दलितांचे मतदान निर्णाय ठरत असल्यामुळे आमच्या पाठिंब्यावर पक्षाचे उमेदवार निवडून येत असल्याचे त्यांनी काही उदाहणे देऊन पटवून दिले. ‘देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहे... तसे उद्धवजीही मित्र ... पण या दोघातील बरे नाही चित्र’ असे यमक साधून या चौक सभेतील उपस्थिताना आठवलेंनी कविताही ऐकवल्या. अपोजिशन वाले मुसलमानो को भडकाते है... हो आपको लढाने का काम करते है... लेकिन हम आपको बढानेका काम करते है... असाही यमक जुळवून त्यांनी मोदी सरकार मुसलमानांच्या हिताचे असल्याचे त्यांनी पटवून दिले. आपण सर्व एकत्र राहून पाक व्यप्त काश्मीर मिळवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जीएसटीमुळे थोडा त्रास झाला. पण त्यासाठी चांगल्या दोन सुधारणा झाल्या आहेत. आगामी या बजेटमध्ये त्यांचा समावेश होईल. नोट बंदीचा थोडा त्रास झाला. दलितांचे आरक्षण जाणार असे सांगून विरोधक दलितांमध्ये भीती घालत आहेत. बाबासाहेबांचे संविधान बदलणार असल्यचे सांगितात. पण जे बाबासाहेबांचे संविधान बदलतील, त्यांना बदलण्याची ताकद आमच्यात आहे. बाबासाहेबांच्या आशिर्वादामुळे... संविधानामुळे ओबीसीतील तेली समाजाचा मी पहिला पंतप्रधान झाल्याचे मोदी यांनी सभागृहात सांगून संविधान बदलता येणार नसल्याची ग्वाही दिल्याचे आठवले यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित झालेले आमदार नरेंद्र पवार... यांची ओळख करून घेताना ते म्हणाले ... ‘मला वाटले शरद पवारांचे भाऊ नरेद्र पवार’ असल्याचे हास्य विनोद त्यांनी यावेळी करून उपस्थिताना खेळवत ठेवले.