दहावीच्या परीक्षेत १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण! राज्याचा निकाल ८९.४१ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 05:49 AM2018-06-09T05:49:27+5:302018-06-09T05:49:27+5:30

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ८९.४१ टक्के लागला आहे. ‘बेस्ट आॅफ फाइव्ह’ पद्धतीने राज्यातील १२५ विद्यार्थांनी १०० टक्के गुण पटकावले आहेत.

 125 students get 100 percent marks in SSC examination The result of the state is 9.44 percent | दहावीच्या परीक्षेत १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण! राज्याचा निकाल ८९.४१ टक्के

दहावीच्या परीक्षेत १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण! राज्याचा निकाल ८९.४१ टक्के

Next

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ८९.४१ टक्के लागला आहे. ‘बेस्ट आॅफ फाइव्ह’ पद्धतीने राज्यातील १२५ विद्यार्थांनी १०० टक्के गुण पटकावले आहेत. यातील तब्बल ७० विद्यार्थी हे एकट्या लातूर विभागातील असून, यामुळे लातूर पॅटर्नचे यश पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकुतला काळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये आॅनलाइन निकाल जाहीर केला. राज्यातून १६ लाख २८ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख ५६ हजार २०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षी दहावीचा निकाल ८८.७४ टक्के लागला होता. त्या तुलनेत यंदाच्या निकालात ०.६७ टक्क्यांची वाढ झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारण्याची परंपरा कायम राखली असून, त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.९७ तर मुलांचे प्रमाण ८७.२७ इतके आहे.
राज्यातील ९ विभागीय मंडळांमध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९६ टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल नागपूरचा ८५. ९७ टक्के लागला आहे. मुंबई ९०.४१, कोकण ९६, पुणे ९२.०८, नाशिक ८७.८२, नागपूर ८५.९७, कोल्हापूर ९३.८८, अमरावती ८६.४९, औरंगाबाद ८८.८१ आणि लातूर ८६.३० अशी निकालाची टक्केवारी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ८६.८७ टक्के लागला.

गुणांमध्ये वाढ
९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६३ हजार ३३१ इतकी आहे.
तर ३५ ते ४५ टक्क्यांदरम्यान गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९९ हजार २६२ इतकी आहे.
४ लाख ३ हजार १३७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ५ लाख ३८ हजार ८९० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

दीड लाख विद्यार्थ्यांना
कलेचे अतिरिक्त गुण
कला व क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य दाखविणाºया विद्यार्थ्यांना २५ गुणांपर्यंत अतिरिक्त गुण राज्य मंडळाकडून दिले जातात. यंदा १ लाख ६६ हजार १८१ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळाले आहेत.

मंडळाकडून एकूण ५७ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती, त्यापैकी ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

Web Title:  125 students get 100 percent marks in SSC examination The result of the state is 9.44 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.