झोपडपट्टी विकासासाठी १२६ कोटींचा निधी

By admin | Published: August 13, 2014 03:08 AM2014-08-13T03:08:47+5:302014-08-13T03:08:47+5:30

मुंबईच्या दोन जिल्ह्यात विधानसभेचे ३४ मतदार संघ असून त्यादृष्टीने गृह निर्माण विभागाने मुंबईत झोपडीवासींयाना पायाभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी म्हाडास १२६ कोटींचे अनुदान मंजूर केले आहे़

126 crores fund for slum development | झोपडपट्टी विकासासाठी १२६ कोटींचा निधी

झोपडपट्टी विकासासाठी १२६ कोटींचा निधी

Next

नारायण जाधव, ठाणे
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध महानगरांतील २००० सालापर्यंतच्या झोपड्या नियमित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य शासनाने आता राजधानी मुंबईतील झोपडीवासींना चांगल्या सुविधा देण्यासाठी १२६ कोटींचा निधी मंजूर केला आहे़
मुंबईच्या दोन जिल्ह्यात विधानसभेचे ३४ मतदार संघ असून त्यादृष्टीने गृह निर्माण विभागाने मुंबईत झोपडीवासींयाना पायाभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी म्हाडास १२६ कोटींचे अनुदान मंजूर केले आहे़ शासनाच्या निर्णयानुसार हे अनुदान मुंबई झोपडीपट्टी सुधार मंडळ, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रिय विकास मंडळ आणि मुंबई इमारत पुनर्रचना व दुरूस्ती मंडळास म्हाडा प्राधिकरणाने त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणात द्यावयाची आहे़ मात्र, झोपडपट्टी पुनर्वसन योजना ज्या ठिकाणी लागू केली आहे, त्या ठिकाणी हा निधी खर्च करण्यास मनाई केली आहे़

Web Title: 126 crores fund for slum development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.