मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबाचा १२७ कोटींचा घोटाळा; भाजपा नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 01:54 PM2021-09-13T13:54:40+5:302021-09-13T13:56:50+5:30

निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात नावेद यांनी सीआरएम सिस्टीम या कंपनीकडून २ कोटींचे तर मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स या कंपनीकडून ३.८५ कोटींचे कर्ज घेतल्याचे दिसते आहे.

127 crore scam of Minister Hasan Mushrif and family; allegations by BJP leader Kirit Somaiya | मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबाचा १२७ कोटींचा घोटाळा; भाजपा नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबाचा १२७ कोटींचा घोटाळा; भाजपा नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

googlenewsNext
ठळक मुद्दे नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक असल्याचे दिसते आहेसहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख ७८ हजार ३४० शेअर्स आहेत.या साखर कारखान्याने अनेक मनी लाँन्ड्रिंग व्यवहार केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ(NCP Hasan Mushriff) आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लॉन्ड्रिंग, बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. याबाबत सोमय्यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकाऱ्याकडे तक्रार करून मुश्रीफ कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

किरीट सोमय्या(BJP Kirit Somaiya) यांनी सांगितले की, मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून येते आहे. नावेद मुश्रीफ यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविताना आपल्या उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येते आहे. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक असल्याचे दिसते आहे. या साखर कारखान्याने अनेक मनी लाँन्ड्रिंग व्यवहार केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात नावेद यांनी सीआरएम सिस्टीम या कंपनीकडून २ कोटींचे तर मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स या कंपनीकडून ३.८५ कोटींचे कर्ज घेतल्याचे दिसते आहे. या दोन्ही कंपन्या कोलकाता येथील असून यांचे संचालक असलेले सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर, गोपाळ पवार हे मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. सहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख ७८ हजार ३४० शेअर्स आहेत. २००३ ते २०१४ या काळात हसन मुश्रीफ हे राज्यात कॅबिनेट मंत्री होते. या काळात घोरपडे साखर कारखान्याला शेल कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये मिळाले आहेत असा दावा सोमय्यांनी केला आहे.

या कारखान्याच्या नावावर जमा झालेल्या रक्कमा

मरुभूमी फायनान्स कडून १५. ९० कोटी

नेक्स्टजेन कन्सल्टन्सी कडून ३५. ६२ कोटी

युनिव्हर्सल ट्रेंडी एलएलपी कडून ४.४९ कोटी

नवरत्न असोसिएट्स कडून ४. ८९ कोटी

रजत कन्झ्युमर सर्व्हिसेस कडून ११.८५ कोटी

माऊंट कॅपिटल कडून २.८९ कोटी.

Web Title: 127 crore scam of Minister Hasan Mushrif and family; allegations by BJP leader Kirit Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.