१२७ चालक आणि ६२ सहप्रवाशांचा मृत्यू

By admin | Published: February 9, 2016 01:29 AM2016-02-09T01:29:45+5:302016-02-09T01:29:45+5:30

दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्याबरोबरच परिवहन विभागातर्फे सहप्रवाशालाही हेल्मेटसक्ती केली आहे. याविरोधात काही ठिकाणी विरोध केला जात असला तरी दुचाकीवरून

127 drivers and 62 fellowship deaths | १२७ चालक आणि ६२ सहप्रवाशांचा मृत्यू

१२७ चालक आणि ६२ सहप्रवाशांचा मृत्यू

Next

मुंबई : दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्याबरोबरच परिवहन विभागातर्फे सहप्रवाशालाही हेल्मेटसक्ती केली आहे. याविरोधात काही ठिकाणी विरोध केला जात असला तरी दुचाकीवरून प्रवास करताना सहप्रवाशाचाही जीव धोक्यात येत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत २0१५मध्ये १२७ चालक आणि ६२ सहप्रवाशांनाही जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हेल्मेटला विरोध करणे किती जिवावर बेतू शकते हे यावरून स्पष्ट होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनचालक आणि त्याच्या मागे बसून प्रवास करणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट वापरणे अनिवार्य असल्याचे परिवहन विभागाकडून नुकतेच सांगण्यात आले. त्यामुळे हेल्मेटला आधीपासून विरोध करणाऱ्यांकडून त्यामध्ये आणखी भर पडली. दुचाकीचालकांप्रमाणेच सहप्रवासीही गंभीर जखमी झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. या अपघातांमध्ये जवळपास २४१ सहप्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. कुलाबा, पायधुनी, वडाळा, नागपाडा, भायखळा, वरळी, चेंबूर, घाटकोपर, मुलुंड, साकीनाका, वांद्रे, विमानतळ, मालाड, कांदिवली, बोरीवली विभागांतर्गत अपघातांची सर्वांत जास्त नोंद वाहतूक पोलिसांकडे झाली आहे.
एकूणच होणाऱ्या अपघातांत चालकाचे आणि सहप्रवाशाचे जाणारे मृत्यू पाहता हेल्मेटसक्ती करण्यासाठी परिवहन विभागाकडून कठोर पाऊल उचलण्यात येत आहे.
दुचाकी वाहन उत्पादकांमार्फत त्यांच्या राज्यातील सर्व वाहन विक्रेत्यांनी दुचाकी वाहन विकताना खरेदीदारास दोन हेल्मेट पुरविण्याविषयी निर्देश दोन दिवसांपूर्वी परिवहन विभागाकडून दिले आहेत. तसेच वाहन नोंदणी करताना सादर केलेल्या कागदपत्रांत वाहनासोबत दोन हेल्मेट पुरविण्यात आल्याचे नमूद असल्याची खातरजमाही करण्यास आरटीओंना सांगितले आहे.

दुचाकीस्वार आणि त्याच्या सहप्रवाशाने हेल्मेट वापरणे हे योग्यच आहे आणि त्याची आम्ही कठोर अंमलबजावणीही करीत आहोत. त्यासाठी हेल्मेटचे उत्पादक आणि हेल्टेम विकणाऱ्या व्यापाऱ्यांनाही तसे निर्देश दिले आहेत. सर्व आरटीओंना दुचाकीची नोंद करताना हेल्मेटही विकत घेतल्याची माहिती कागदपत्रांत नमूद आहे का हे तपासण्यास सांगितले आहे.
- सतीश सहस्रबुद्धे, अतिरिक्त परिवहन आयुक्त, राज्य

Web Title: 127 drivers and 62 fellowship deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.