आरटीओमधील १,२८५ पदे रिक्त
By admin | Published: July 30, 2015 02:53 AM2015-07-30T02:53:28+5:302015-07-30T02:53:28+5:30
वर्षाला साडेपाच हजार कोटींपेक्षाही अधिक महसूल देणारे राज्यातील परिवहन आयुक्त मुख्यालय आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आरटीओत अवघे २ हजार ८१५ अधिकारी तसेच कर्मचारी कार्यरत
- सुशांत मोरे, मुंबई
वर्षाला साडेपाच हजार कोटींपेक्षाही अधिक महसूल देणारे राज्यातील परिवहन आयुक्त मुख्यालय आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आरटीओत अवघे २ हजार ८१५ अधिकारी तसेच कर्मचारी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे तब्बल १,२८५ पदे रिक्त आहेत. असे असूनही शासनातर्फे याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
राज्यात आरटीओचा (प्रादेशिक परिवहन अधिकारी) मोठा पसारा आहे. जवळपास ५0 आरटीओ कार्यालये आणि त्यांची उप कार्यालये आहेत. यात वाहनांची नोंदणी करणे, परवान्यांचे नूतनीकरण करणे
यासह अनेक कामे आरटीओतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना करावी लागतात. त्याचबरोबर त्यांच्यावर विशेष मोहिमांचीही जबाबदारी दिली जाते.
आरटीओतील अधिकारी आणि कर्मचारी ही जबाबदारी पार पाडत असतानाच परिवहन आयुक्त मुख्यालयातही अवघ्या काही कर्मचाऱ्यांमध्येच कामाचा गाडा हाकत आहेत. याबाबत परिवहन विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले की, राज्यात २00४ साली ४ हजार १00 पदे मंजूर करण्यात आली होती.
१० वर्षांपूर्वी एवढी पदे मंजूर करूनही फक्त २ हजार ८१५ जण कार्यरत असल्याने काम करणे कठीण होऊन बसले आहे. जवळपास १ हजार २८५ पदे ही रिक्त असून, ती भरण्यासाठी शासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. मोटार वाहन निरीक्षकाची १0९, तर साहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाची ३0६ पदे रिक्त आहेत. लिपिक-टंकलेखकाची २७४, साहाय्यक रोखपालची ६९, कर अन्वेषकची ६0, वाहनचालकाची १७, परिवहन हवालदार ५९, शिपाइ ४९ पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले.
कसा दिलासा द्यायचा हा प्रश्नच
रिक्त असलेल्या आणखी काही महत्त्वाच्या पदांमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी एक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ६, मोटार वाहन अभियोक्ता ९, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ११ पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले.
शासनाकडून नुकतीच नवीन भरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून रिक्त पदांची भरती करण्यासाठीचा नवीन प्रस्ताव शासनाकडे एक महिन्यापूर्वीच पाठवण्यात आला आहे.
अ,ब,क, ड श्रेणींतील
पदांची आकडेवारी
श्रेणीमंजूर पदेभरलेली रिक्त
अ७६१६२२१३९
ब४६२२२४
क२,८६६१,९३0९३६
ड४२७२४११८६