१२९ नगराध्यक्षपदे खुल्या प्रवर्गासाठी

By admin | Published: October 6, 2016 05:29 AM2016-10-06T05:29:17+5:302016-10-06T05:29:17+5:30

राज्यातील १८ नगरपंचायतींचे अध्यक्षपद व २३३ नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदांसाठी आरक्षण सोडत बुधवारी मंत्रालयात पार पडली

129 City President for open category | १२९ नगराध्यक्षपदे खुल्या प्रवर्गासाठी

१२९ नगराध्यक्षपदे खुल्या प्रवर्गासाठी

Next

मुंबई : राज्यातील १८ नगरपंचायतींचे अध्यक्षपद व २३३ नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदांसाठी आरक्षण सोडत बुधवारी मंत्रालयात पार पडली. या सोडतीत १८ नगरपंचायतीपैकी दोन नगरपंचायतींचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी, पाच अनुसूचित जमातीसाठी, सहा ओबीसीसाठी आरक्षित झाले. खुल्या प्रवगार्साठी पाच जागा असतील.
नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या उपस्थित ही सोडत प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षपदासाठी सोडत काढण्यात आलेल्या २३३ नगरपरिषदांपैकी अनुसूचित जातीसाठी ३१, अनुसूचित जमातीसाठी १०, ओबीसीसाठी ६३ आरक्षित झाली. तर खुल्या प्रवर्गासाठी १२९ पदे असतील.
१८ नगरपंचायतींचे आरक्षण पुढीलप्रमाणे - अनुसूचित जाती (खुला) - सिंदेवाही, तर (महिला) - कवठेमहांकाळ
अनुसूचित जमाती (खुला) - विक्रमगड, नेवासा, तर (महिला)- मोखाडा, तलासरी, मेढा.
ओबीसी- पाटण, खंडाळा (महिला)- कडेगांव, वडुज, दहीवडी, शिराळा.
खुला प्रवर्ग- बोदवड, रेणापूर, खानापूर, कोरेगाव, देवगड-जामसांडे.
नगराध्यक्षपदासाठी सोडत काढण्यात आलेल्या २३३ नगरपरिषदांमधील आरक्षण पुढीलप्रमाणे - अनुसूचित जाती प्रवर्ग : शेंदूरजना घाट, जामखेड, दुधनी, उमरखेड, पलूस, चाकण, पाचोरा, बसमत, दारव्हा, सिल्लोड, कारंजा (जि. वाशिम), सासवड, मानवत, तासगाव, इचलकरंजी, तर (महिला)- महाबळेश्वर, अंबड, चाळीसगांव, शेवगांव, वाई, साकोली, खामगाव, लोणार, पाथरी, खोपोली, पातूर, जयसिंगपूर, आळंदी, सिंदी रेल्वे, नांदुरा, कराड.
अनुसूचित जमाती प्रवर्ग-चिमूर, नागभीड, सिंदखेडराजा, सिन्नर, देवळी तर (महिला)- गडचांदूर, यावल, आर्णी, चांदवड, फैजपूर.
ओबीसी - किल्लेधारुर, गेवराई, राजापूर, पैठण, म्हसवड, बारामती, रहिमतपूर, वडगांव कसबा, मलकापूर (कोल्हापूर), राहूरी, मेहकर, पारोळा, एरंडोल, अंबरनाथ, वेंगुर्ला, भडगांव, निलंगा, आर्वी, मुदखेड, राजगुरुनगर, नांदगांव, चांदूर रेल्वे, अलिबाग, बार्शी, मुरगुड, तळोदे, भंडारा, लोहा, किनवट, चांदूर बाजार, खेड, कळमनुरी. (महिला) - जत, जेजुरी, मंगळवेढे, उरण, पन्हाळा, चिखली, रिसोड, आष्टा, तळेगांव दाभाडे, पुसद, सावनेर, कुंदलवाडी, भूम, पूर्णा, गडचिरोली, अहमदपूर, पवनी, कन्नड, मुरुम, जळगांव जामोद, अचलपूर, कळंब, परळी वैजनाथ, पेठ उमरी, हादगांव, धमार्बाद, फलटण, बुलडाणा, कागल, उमरगा, जामनेर.
खुला प्रवर्ग- कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, संगमनेर, अकोट, बाळापूर, दयार्पूर बानोसा, धामणगाव रेल्वे, अंजनगाव, खुलताबाद, माजलगाव, बीड , तुमसर, बल्लारपूर, भद्रावरती, राजोरा, वरोरा, दोंडाईचा-वरवाडे, गोंदिया, हिंगोली, भुसावळ, वरणगाव, रावेर, धरणगाव, गडहिंग्लज, कुरुंदवाड, उदगीर, औसा, कामठी, वाडी (सीटी), रामटेक, नरखेड, मोवाड, मुखेड,देगलूर,नंदुरबार ,शहादा, इगतपुरी , येवला, सटाणा, त्र्यंबक, उस्मानाबाद, परांडा, जव्हार, डहाणू, गंगाखेड, शैलू, जुन्नर, पेण, श्रीवर्धन, रोहा अष्टमी ,रत्नागिरी, इस्लामपूर,पाचगणी, सावंतवाडी, मालवण, कुर्डवाडी, करमाळा, सांगोले, पंढरपूर, वर्धा, हिंगणघाट,देवळी, वाशिम, वणी. (महिला)- चिपळूण, सातारा, मुर्तिजापूर, आंबेजोगाई, मनमाड, खापा, लोणावळा, पांढरकवडा, दौंड, विटा, शिरुर, मोर्शी, अक्कलकोट, चोपडा, सोनपेठ, कन्हान पिंपरी, राहता पिंपळस, कळमेश्वर, भोर, नवापूर, कर्जत, काटोल, अंमळनेर, नळदुर्ग, मंगळूरपीर,
दिग्रस, नेर नबाबपूर, मुरुड-जंजीरा, देऊळगांव राजा, माथेरान, जिंतूर, बदलापूर, कंधार, मोहपा, घाटंजी, श्रीगोंदा, देसाईगंज, इंदापूर, ब्रम्हपूरी, भगूर, मैंदर्गी, चिखलदरा, मूल, तिरोडा, तेल्हारा, पालघर, भोकरदन, शेगांव, महाड, सांगोले, वैजापूर, तुळजापूर, बिलोली, उमरेड, यवतमाळ, श्रीरामपूर, भोकर, शिरपुर वरवाडे, पुलगांव, जालना, मोहोळ, परतुर, गंगापूर, वरुड, सावदा. (प्रतिनिधी)

Web Title: 129 City President for open category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.