बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 05:31 AM2024-11-22T05:31:58+5:302024-11-22T05:33:59+5:30

परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

12th February 11th, 10th exam from 21st February; The board appeals not to believe the viral schedule | बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन

बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. वेळापत्रकानुसार बारावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा ते १० फेब्रुवारी या कालावधीत, तर दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. 

परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. 

म्हणून परीक्षा लवकर

यावेळी राज्य मंडळाच्या परीक्षा आठ ते दहा दिवस लवकर होत आहेत. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा होतात. निकाल मे-जूनमध्ये लागतो. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होते.

यात जाणारा वेळ, अभ्यासासाठी वेळ मिळणे, प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने राज्य मंडळाने यंदा बारावी-दहावीच्या परीक्षा आठ ते दहा दिवस लवकर घेण्याचा निर्णय घेतला होता. 

Web Title: 12th February 11th, 10th exam from 21st February; The board appeals not to believe the viral schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.